Top
  >  Blog Featured   >  हिवाळा ऋतूची जादू अनुभवण्यासाठी चला केदारकांथा ट्रेक ला !

हिवाळा ऋतूची जादू अनुभवण्यासाठी चला केदारकांथा ट्रेक ला !

हिवाळ्यात ट्रेकिंग ला कुठे जायचं असा प्रश्न पडलाय?

केदारकांथा हेच उत्तर.

महाराष्ट्रात खरं तर ट्रेकिंग साठी काही कमी नाही. सह्याद्री हि गिर्यारोहकांसाठी लाभलेली एक देणगीच आहे. पण बर्फाचा अनुभव घायचा असेल तर हिमालय पर्वतांशिवाय पर्यायच नाही. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा ट्रेक १२५०० उंचीचा आहे. गिर्यारोहकांनी आयुष्यात एकदा तरी नक्की करावा असा हा ट्रेक. या ट्रेकिंग च्या प्रवासाची सुरुवात होते ती संकरी या सुंदरश्या गावातून.

 

उत्तराखंड राज्यातील केदारकांथा हा ट्रेक हिवाळ्यातच का करावा ?

१. या ट्रेकचं वैशिष्ठ्य असं कि गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नसला तरी हा करण्यासारखा आहे. सोप्पे मार्ग असल्यामुळे आजूबाजूच्या भव्य सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेता येतो.

 

२. डिसेंबर पासून ते एप्रिल पर्यंत चहूकडे बर्फच बर्फ नजरेस पडतो. जसे जसे तुम्ही १००० ft च्या पुढे जाल तस तसे बर्फाच्छादित भूप्रदेश दिसायला सुरुवात होईल.

 

३. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत देवदार वृक्षांच्या रांगा, भव्य हिमालयीन पर्वत, नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या जागांची दृश्ये आणि देखण्या कॅम्पसाईट्स यांचा अनुभव केदारकांथा पर्यंत चा प्रवास तुम्हाला देईल.

 

४. बर्फात कॅम्पिंग कधी केलाय?

चांदण्यांच्या चादरीखाली झोपणे, कॅम्प फायर च्या भोवती बसून गप्पा मारणे. बर्फाचा स्नोमॅन बनवणे या सगळ्या गमती केदारकांथा च्या कॅम्पसाईट वर तुम्हाला अनुभवता येतील. दिवस असो वा रात्र या कॅम्पसाईट्स चे सौंदर्य वाढतच जाते.

५. फोटोग्राफी ची आवड असलेल्यांसाठी तर हा ट्रेक आणि तिथले मार्ग हे आदर्श आहेत. काढाल तितकी छायाचित्रे कमीच पडतील अशी निसर्गाची किमया इथे आहे.

 

६. या ट्रेकिंग मधील सर्वात अविस्मरणीय भाग तो आहे जेव्हा तुम्ही शिखराच्या टोकावरून ३६० डिग्री मध्ये हिमालयाचे रूप बघता. बंदरपूंच, कलनाग, गंगोत्री व यमुनोत्री आणि त्याच बरोबर अशा असंख्य पर्वताचा यात समावेश आहे.

 

७. या प्रवासात साहसाबरोबरच संकरी येथे संस्कृती आणि आदरातिथ्य तुम्हाला अनुभवता येईल.

 

बर्फाच्छादित हिमालयीन पर्वतांपासून ते बर्फाने गोठलेल्या तलावांपर्यंत,

घनदाट जंगलांपासून ते देवदार वृक्षांपर्यंत ,

साहसापासून ते शांतपणे निर्गाकडे टक लावून बघत बसण्यापर्यंत,

रात्री ताऱ्यांखाली झोपण्यापासून ते बर्फात धम्माल करेपर्यंत,

केदारकांथा ट्रेक हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव असू शकतो.

 

कसली वाट बघताय ? बॅग भरा आणि हिवाळ्यात केदारकांथा ट्रेकिंग चा अनुभव घ्यायला चला.

Lupta, December 26, 2022