स्वादिष्ट पदार्थ चाखण्यासाठी आणि बनवण्यासाठी चला अरुणाचल प्रदेशात…
स्वादिष्ट पदार्थ चाखण्यासाठी आणि बनवण्यासाठी चला अरुणाचल प्रदेशात…
वळणावळणाचे रस्ते,
डोंगराच्या पायथ्याशी वसलेली सुंदरशी गावं,
तिथली प्रेमळ माणसं,
बर्फाच्छादित डोंगरांची दृश्ये,
आणि स्वादिष्ट पदार्थ
या सगळ्या गोष्टी कोणालाही अरुणाचल प्रदेशाच्या प्रेमात पडतील.
अरुणाचल प्रदेशातील संस्कृती व विविधता जवळून अनुभवण्यासाठी आखलेला हा खास दौरा. या दौऱ्यात पाककला आणि खाद्यप्रकारांची बरीचशी रहस्यं तुम्हाला उलगडतील. जर तुम्हाला फिरण्याची, नवीन गोष्टी अनुभवण्याची आणि शिकण्याची आवड असेल तर हीसंधी मुळीच सोडू नका.
अरुणाचल प्रदेश अनुभवण्यासाठी हीसहल का योग्य आहे ?
१. विविधतेने नटलेलं हे भारतातील राज्य अतिशय सुंदर आहे. इथे २६ मूळ जमाती व बऱ्याच उपजमातीचे लोक राहतात. खामती, सिंगको, तांगास आणि अशा बऱ्याच जमाती इथे बघायला मिळतात.
२. या विविध जमातींचे खाद्यपदार्थ जसे कि बांबूमधील भात, तांदुळाच्या पिठाबरोबर केलेले चिकन, उकडलेल्या हिरव्यागार हंगामी भाज्या, भाजलेले डुक्कराचे मांस, पोर्क सलाड व त्याचबरेबर स्थानिक औषधी वनस्पती हे सर्व भारताच्या या भागात तुम्हाला बघायला मिळेल.
३. स्थानिक भाजीबाजाराला भेट देणे , गावकऱ्यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेणे, त्यांच्या आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक उत्सवांचा अनुभव घेणे या सगळ्यांचा समावेश या दौऱ्यात केलेला आहे.
४. प्रत्येक जमातीची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. भाषा, संस्कृती आणि खाद्यप्रकारातील वेगळेपण आणि महत्व तिथे जाऊन अनुभवण्याची मजाच वेगळी असते.
५. पाककला शिकण्याचा अनुभव , रुचकर अन्न चाखण्यासोबतच ते बनवण्याची कला आणि त्याच्या उत्तम चवीमागील रहस्य जाणून घ्यायचं असेल तर या सहलीचा नक्की भाग व्हा.
६. खामती समाजाच्या सौ. बेला यांच्या सुंदरश्या घरात राहण्याचा वेगळा एक अनुभव तुम्हाला घेता येईल.
७. या सर्व जमाती राहतात तिथल्या परिसराचा त्याच्या राहणीमानावर व खाद्यपदार्थांवर कसा प्रभाव पडतो हे शिकता येईल.
८. मिआओ आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मनसोक्त फिरत येईल.
निश्चित निर्गमन : १२ फेब – १६ फेब २०२३
विविधता, मग ती भाषेतील असुदे वा खाण्यातील, लोकांतील असुदे वा त्यांच्या सुंदर पोशाखातील, संस्कृतीतील असुदे वा राहणीमानात, जागेतील असुदे वा कलेतील, त्यातील अनोखेपणा जाणून घ्यायचा असेल तर त्या जागेला भेट देणे याशिवाय योग्य पर्याय नाही. हि सर्व विविधता अनुभवण्यासाठी अरुणाचल प्रदेश शिवाय उत्तम जागाच नाही.
या संपूर्ण सहलीचा अनुभव अविस्मरणीय होतो तो सुंदरश्या जागांची सैर केल्याने, नवीन लोकांना भेटल्याने, त्याच्या घरी जाऊन मनमुराद खाण्याचा आस्वाद घेतल्याने, त्यांच्याशी पोटभर गप्पा मारल्याने आणि त्यांच्यातीलच एक होऊन तिथल्या सांस्कृतिक उत्सवात भाग घेतल्याने.
जर तुम्हालाही असे वेगळे अनुभव घेरण्याची इच्छा असेल तर या दौऱ्याचा नक्की भाग व्हा. कधीही न केलेल्या गोष्टी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तो आनंद अनुभवा.
Lupta, Jan 17, 2022