Blogs

इडली डोसा विसरा आणि ‘हे चविष्ट पदार्थ’ चाखा केरळच्या भूमीवर!

इडली डोसा विसरा आणि ‘हे चविष्ट पदार्थ’ चाखा केरळच्या भूमीवर!

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard

April 14, 2025

Ranjana Kokane

साउथ इंडियन फूड म्हटले कि सगळ्यांना अण्णा आणि त्याचा इडली डोसा, सांबर, ओल्या नारळाची चटणी आठवते. इकडचे सगळे पदार्थ हे कोकोनट ऑइल मध्येच बनवले जातात असे देखील समजले जाते. परंतु हे सगळे एक मिथ्य आहे. असं बिलकुल देखील नाही कारण आताच्या जागतिकीकरणामध्ये फूड चे देखील जागतिकीकरण झाले आहे. अगदी मुंबईचा वडापाव आणि पुण्याची भाकरवडी अमेरिकेमध्ये देखील बनविले जाते आहे. महाराष्ट्रामध्ये इडली डोसा हे केवळ नाष्ट्यापुरते मर्यादित आहे आणि हीच पद्धती केरळमध्ये देखील आहे. मुख्य जेवण म्हणजे आपल्या लंच आणि डिनर मध्ये स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ बनविले जातात . फिश फ्राय, फिश करी, मटण करी आणि कबाब , चिकन बिर्याणी, चिकन कबाब हे येथेदेखील खूप लोकप्रिय आहे. लोक चवीने खातात आणि पाहुण्यांना देखील अगत्याने खाऊ घालतात.

  • इडियप्पम आणि करी
  • अप्पम
  • झणकेबाज चिकन फ्राय
  • परीप्पु करी
  • पुट्टू आणि काडला करी
  • एरीसेरी

इडियप्पम आणि करी

तांदळाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून शेवईप्रमाणे दिसणारा हे टेस्टी शाकाहारी पदार्थ आहे. तुम्ही हा पदार्थ वेगवेगळ्या रस्सा भाजी किंवा करी सोबत खाऊ शकता. विशेषकरून अंडा करी सोबत हा पदार्थ खूप टेस्टी मानला जातो. केरळमध्ये या पदार्थाला नूलाप्पम असे देखील म्हटले जाते.

अप्पम

आंबावलेल्या तांदळापासून अप्पम बनवला जातो. या रेसिपीमध्ये आंबवलेले तांदूळ, कोकोनट मिल्क, कोकोनट वाटर आणि थोडी चवीनुसार साखर मिक्स केली जाते. अगदी पातळसा पॅनकेक बनवला जातो ज्याचे कडेचा भाग तुम्हाला एकदम क्रिस्पी टेस्ट देईन. हा पदार्थ देखील करीसोबत खाल्ला जातो. युरोपियन पद्धतीची करी यासोबत खाण्यासाठी बनवली जाते. या करीमध्ये कोकोनट मिल्क, दालचीनी, लवंग, आंबा आणि इतर मिक्स करून ती बनविली जाते. मसाले आणि नारळाच्या सुवासाने हि करी एक स्वादिष्ट अप्पमची परिपूर्णता वाढविते.

झणकेबाज चिकन फ्राय

आपल्याला वाटते महाराष्ट्रातील लोकांनाच झणकेबाज पदार्थ करता येतात आणि खायला आवडतात पण तसे नाहीये. केरळमध्ये देखील झणकेबाज पदार्थ बनविले जातात. त्यामध्ये चिकन फऱ्या मोठ्या चवीने चाखले जाते. कांदा, लसूण व्हिनेगर तसेच केरळमधील सर्व स्पेशल असणारे मसाले भरपूर घातले जातात. हे चिकन फ्राय केरळ रोटी,केरळ पराठा, अप्पम, भात किंवा इतर पदार्थासोबतही खाल्ले जाते.

परीप्पु करी

हरभऱ्याच्या डाळीमध्ये अनेक पद्धतीचे मिरची मसाले घालून आपल्या महाराष्ट्रीयन आमटी प्रमाणे हि करी बनविले जाते आणि अगदी घरच्यासारखी तिला चव असते. त्यामुळे सर्वत्र चवीने ती खाल्ली जाते.

पुट्टू आणि काडला करी

इडली डोसा व्यतिरिक्त दुसरे पदार्थ देखील ब्रेकफास्ट साठी बनविले जातात. त्यामध्ये पुट्टू आणि काडला करी येथील लोकांचा पसंतीचा ब्रेकफास्ट आहे. पुट्टु म्हणजे शिजवलेल्या भाताला एकत्रित घट्ट करून लांब वडीसारखा आकार दिला जातो. हे पुट्टु पिकलेले केळी, नारळ आणि काळ्या चण्याच्या आमटीबरोबर खाल्ला जातो.

एरीसेरी

एरीसेरी- लाल भोपळा म्हणजेच डांगराला मीठ, मिरची, नारळ, हळद पावडर, जिरे आणि लसनासोबत शिजविले जाते थोडक्यात लाथपथ भाजी बनविली जाते आणि ती भातासोबत खाल्ली जाते. हे केरळमधी सर्वात आवडीचे जेवण मानले जाते आणि विशेषकरून ओणममध्ये हे बनविले जाते.

केरळला उत्कृष्ट असा समुद्रकिनारा लाभला असल्यामुळे वेगवेगळ्याप्रकारचे फ्रेश सीफूड चाखायला येथे मिळते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सीफूड मिळते त्यामध्ये विविध प्रकारचे मासे, प्रॉन, खेकडे, स्क्विड आणि शेल्फीश हे आहेत. अप्पम आणि खेकडा मसाला, अरिकडुक्का, गोल्डन फ्रायड प्रॉन, झिंगा करी, चेम्मीण मुरीन्गक्का करी असे माश्याचे चवदार, अगदी तोंडाला पाणी आणणारे पदार्थ केरळमध्ये बनविले जातात. फिश लव्हर्स साठी केरळ फूड म्हणजे एक प्रकारची मेजवानीच ठरेल.

जर तुम्ही येथील मांसाहारी जेवणाचा स्वाद नाही घेतला तर तुमची केरळ ट्रिप अर्धवटच राहील. येथील बहुसंख्य लोक हे मांसाहारी आहेत. चिकन, मटण, बीफ, पोर्क सर्रासपणे खाल्ले जाते. येथील मांसाहारी जेवणाची अगदी जगभर चर्चा आहे. कोझी करी रेसिपी, मलबार चिकन आणि मटण बिर्याणी, अप्पम आणि चिकन स्टु रेसिपी, आडु अट्टीपत्तल रेसिपी, केरळ मटण सूप, कुंजी पत्तिरी, ग्रिल्ड चिकन, चिकन मिंट रोस्ट हे सर्व मांसाहारी पदार्थ टेस्ट केल्याशिवाय येऊ नका. कदाचित या सर्व अन्नाच्या चवीने तुमची आहाराची रुची आणखी वाढेल कारण केरळची फूड संस्कृती भारताच्या विविधतेप्रमाणे आहे म्हणून केरळ ट्रीपला जाणाऱ्याने सर्व पदार्थ एकदा टेस्ट करून या. सर्व पदार्थांची चव आयुष्यभर जिभेवर राहील असं आम्हाला वाटतंय. चला तर मग जाऊ या केरळचं जेवण जेवायला इज इंडिया ट्रॅव्हल सोबत!

easeindia

Share
Published by
easeindia

Recent Posts

पशु-प्रेमियों के लिए केरल: अपने प्यारे साथी संग अविस्मरणीय छुट्टियाँ

अगर आप उन यात्रा के शौकीन लोगों में से हैं जिन्हें अपने प्यारे पालतू जानवर…

1 month ago

तंज़ानिया: परिवारों और वरिष्ठ नागरिकों के लिए एक अविस्मरणीय अनुभव

जब बात छुट्टियों की आती है, तो अक्सर हम ऐसी जगह की तलाश करते हैं,…

1 month ago

Top 5 Tips to Prevent Acute Mountain Sickness & Know Ladakh Altitudes

Acute mountain sickness (AMS) in Ladakh can...

3 months ago

Anini Arunachal Pradesh: The Best Summer Getaway in 2025

Anini remains largely off most travelers...

3 months ago

लद्दाख यात्रा: “एंक्यूट माउंटेन सिकनेस (AMS)” से कैसे बचें?

लद्दाख की पहाड़ियाँ, वादियाँ, ठंडी-नरम हवाएँ और अद्भुत नज़ारे हर...

4 months ago

Standing Seats on Aircrafts

The latest “innovation” for air travel are...

4 months ago