साउथ इंडियन फूड म्हटले कि सगळ्यांना अण्णा आणि त्याचा इडली डोसा, सांबर, ओल्या नारळाची चटणी आठवते. इकडचे सगळे पदार्थ हे कोकोनट ऑइल मध्येच बनवले जातात असे देखील समजले जाते. परंतु हे सगळे एक मिथ्य आहे. असं बिलकुल देखील नाही कारण आताच्या जागतिकीकरणामध्ये फूड चे देखील जागतिकीकरण झाले आहे. अगदी मुंबईचा वडापाव आणि पुण्याची भाकरवडी अमेरिकेमध्ये देखील बनविले जाते आहे. महाराष्ट्रामध्ये इडली डोसा हे केवळ नाष्ट्यापुरते मर्यादित आहे आणि हीच पद्धती केरळमध्ये देखील आहे. मुख्य जेवण म्हणजे आपल्या लंच आणि डिनर मध्ये स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ बनविले जातात . फिश फ्राय, फिश करी, मटण करी आणि कबाब , चिकन बिर्याणी, चिकन कबाब हे येथेदेखील खूप लोकप्रिय आहे. लोक चवीने खातात आणि पाहुण्यांना देखील अगत्याने खाऊ घालतात.
-
इडियप्पम आणि करी
-
अप्पम
-
झणकेबाज चिकन फ्राय
-
परीप्पु करी
-
पुट्टू आणि काडला करी
-
एरीसेरी
अप्पम
आंबावलेल्या तांदळापासून अप्पम बनवला जातो. या रेसिपीमध्ये आंबवलेले तांदूळ, कोकोनट मिल्क, कोकोनट वाटर आणि थोडी चवीनुसार साखर मिक्स केली जाते. अगदी पातळसा पॅनकेक बनवला जातो ज्याचे कडेचा भाग तुम्हाला एकदम क्रिस्पी टेस्ट देईन. हा पदार्थ देखील करीसोबत खाल्ला जातो. युरोपियन पद्धतीची करी यासोबत खाण्यासाठी बनवली जाते. या करीमध्ये कोकोनट मिल्क, दालचीनी, लवंग, आंबा आणि इतर मिक्स करून ती बनविली जाते. मसाले आणि नारळाच्या सुवासाने हि करी एक स्वादिष्ट अप्पमची परिपूर्णता वाढविते.
झणकेबाज चिकन फ्राय
आपल्याला वाटते महाराष्ट्रातील लोकांनाच झणकेबाज पदार्थ करता येतात आणि खायला आवडतात पण तसे नाहीये. केरळमध्ये देखील झणकेबाज पदार्थ बनविले जातात. त्यामध्ये चिकन फऱ्या मोठ्या चवीने चाखले जाते. कांदा, लसूण व्हिनेगर तसेच केरळमधील सर्व स्पेशल असणारे मसाले भरपूर घातले जातात. हे चिकन फ्राय केरळ रोटी,केरळ पराठा, अप्पम, भात किंवा इतर पदार्थासोबतही खाल्ले जाते.
पुट्टू आणि काडला करी
इडली डोसा व्यतिरिक्त दुसरे पदार्थ देखील ब्रेकफास्ट साठी बनविले जातात. त्यामध्ये पुट्टू आणि काडला करी येथील लोकांचा पसंतीचा ब्रेकफास्ट आहे. पुट्टु म्हणजे शिजवलेल्या भाताला एकत्रित घट्ट करून लांब वडीसारखा आकार दिला जातो. हे पुट्टु पिकलेले केळी, नारळ आणि काळ्या चण्याच्या आमटीबरोबर खाल्ला जातो.
केरळला उत्कृष्ट असा समुद्रकिनारा लाभला असल्यामुळे वेगवेगळ्याप्रकारचे फ्रेश सीफूड चाखायला येथे मिळते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सीफूड मिळते त्यामध्ये विविध प्रकारचे मासे, प्रॉन, खेकडे, स्क्विड आणि शेल्फीश हे आहेत. अप्पम आणि खेकडा मसाला, अरिकडुक्का, गोल्डन फ्रायड प्रॉन, झिंगा करी, चेम्मीण मुरीन्गक्का करी असे माश्याचे चवदार, अगदी तोंडाला पाणी आणणारे पदार्थ केरळमध्ये बनविले जातात. फिश लव्हर्स साठी केरळ फूड म्हणजे एक प्रकारची मेजवानीच ठरेल.
जर तुम्ही येथील मांसाहारी जेवणाचा स्वाद नाही घेतला तर तुमची केरळ ट्रिप अर्धवटच राहील. येथील बहुसंख्य लोक हे मांसाहारी आहेत. चिकन, मटण, बीफ, पोर्क सर्रासपणे खाल्ले जाते. येथील मांसाहारी जेवणाची अगदी जगभर चर्चा आहे. कोझी करी रेसिपी, मलबार चिकन आणि मटण बिर्याणी, अप्पम आणि चिकन स्टु रेसिपी, आडु अट्टीपत्तल रेसिपी, केरळ मटण सूप, कुंजी पत्तिरी, ग्रिल्ड चिकन, चिकन मिंट रोस्ट हे सर्व मांसाहारी पदार्थ टेस्ट केल्याशिवाय येऊ नका. कदाचित या सर्व अन्नाच्या चवीने तुमची आहाराची रुची आणखी वाढेल कारण केरळची फूड संस्कृती भारताच्या विविधतेप्रमाणे आहे म्हणून केरळ ट्रीपला जाणाऱ्याने सर्व पदार्थ एकदा टेस्ट करून या. सर्व पदार्थांची चव आयुष्यभर जिभेवर राहील असं आम्हाला वाटतंय. चला तर मग जाऊ या केरळचं जेवण जेवायला इज इंडिया ट्रॅव्हल सोबत!