Top
  >  Blog Featured   >  जेष्ठ नागरिकांसाठी परिपूर्ण असलेले पर्यटन स्थळ – हंपी

जेष्ठ नागरिकांसाठी परिपूर्ण असलेले पर्यटन स्थळहंपी  

निसर्ग आणि शिल्पकलेचा आविष्कार असलेले दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात वसलेलं सुंदरसं गाव म्हणजे हंपी. शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा चमत्कार असलेली मंदिरं विजयनगरचा वैभवशाली  इतिहास अनुभवायचा असेल हंपी ला हमखास भेट द्यावी 

मध्ययुगीन दक्षिण भारतामध्ये, तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेलं हे वैभवसंपंन्न नगर आजही दिमाखात उभं आहे. देखण्या वाटा, भव्य मंदिरं, नक्षीदार कोरीवकाम केलेले स्तंभ, साधी जीवनशैली आणि निसर्गाची किमया कोणालाही हंपी कडे आकर्षित करून घेईल 

वरिष्ठ नागरिकांसाठी हंपी हे एक परिपूर्ण आणि सोयीस्कर पर्यटन स्थळ कसं आहे ? 

. मुळातच हंपी पर्यंत पोहचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्या मूळे तिथे जाणे सोप्पे आहे. रस्त्याने किंवा ट्रेनने  हंपीपर्यंत सहज प्रवास करता येतो.  

. हंपी मधील वातावरण हे अगदी आल्हाददायक प्रसन्न असते. त्यामुळे वयस्कर नागरिकांना हंपी फिरताना अडचणी येत नाहीत  

. भारताचा सुवर्ण काळ पाहिलेले हंपी हे शहर ऐतिहासिक वस्तुंनी नटलेलं आहे. त्या काळातील मूर्तिकलेतील, स्थापत्यकलेतील, शिल्पकलेतील, वास्तुकलेत कौशल्य पदोपदी दिसून येते. आणि या सर्व  जागा जमिनीलगद असल्याने  वरिष्ठ लोकांना फिरण्यासाठी योग्य आहेत. 

. Ease India Travel वरिष्ठांची राहण्याची सोय खास तळ मजल्या वर करतात 

. हंपी हे एक असा पर्यटन स्थळ आहे जे सगळ्यांना आपलंसं करून घेतं. तरुणांपासून ते वयस्कर नागरिकांपर्यंत हंपी कडे सर्वांसाठी काहीतरी खास अनुभव असतात. 

. इतिहासाबरोबरच हंपीला निसर्गाची देणगी लाभलेली आहे. तुंगभद्रेच्या काठी फेरफटका मारण्याचा हि एक वेगळाच अनुभव आहे 

. हंपी चा परिसर तुलनेने लहान असल्यामुले इथे मनसोक्त भटकंती करणे सोपे जाते. हंपीतील जागा या मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. 

. हंपी हे तुम्हाला भूतकाळात घेऊन जाते. हंपीचा सांस्कृतिक वारसा आणि वास्तुकलेत श्रीमंती प्रवाश्याना पावलोपावली बघायला मिळते. हंपी हे ठिकाण एखाद्या खुल्या संग्रहालयासारखे आहेतुम्हाला फक्त तुमच्या गतीने ते ठिकाण एक्सप्लोर करावे लागेल आणि त्याचे आकर्षण शोधावे लागेल 

. हंपीमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जी तुम्हाला मध्ययुगीन राजे आणि सम्राटांच्या राजवटीत पोहचवतील. विजयनगरच्या ऐतिहासिक शहराच्या अवशेषांनी वेढलेले, हम्पी हे अवशेष  आणि कलेचा खजिना आहे. विरुपाक्ष मंदिर, विजया विठ्ठला मंदिर, लोटस महाल, हम्पी बाजार, हिप्पी बेट, कोरेकल राइड, राणीचे स्नान गृह, पुरातत्व संग्रहालय, नदीकिनारी असलेले अवशेष, भूमिगत मंदिर, गगन महाल, आणि इतर अनेक ठिकाणे जेष्ठ नागरिक सहजतेने फिरू शकतात. 

 

इतिहास, निसर्ग आणि शांतता यांचे परिपूर्ण मिश्रण हंपीत आहे, त्यामुळे हे जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी नवीन अनुभव घेण्यासाठी एक आदर्श स्थळ आहे. एकंदरीत, हंपी हे इतर भारतीय शहरांच्या गजबजाटापासून दूर असलेले स्वप्नवत ठिकाण आहे. 

Lupta, Feb 22, 2023