हे ठिकाण काळ्या पाण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते कारण स्वातंत्र्ययुद्ध काळात अनेक स्वातंत्र्यसेनानींना या जेलमध्ये बंदिस्त राहावे लागले. या ठिकाणी एक म्युझिअम आहे. स्वातंत्र्ययुद्धामध्ये सामील झालेल्या आणि ज्यांना या जेलमध्ये कैद करण्यात आले होते त्या सर्व सेनानींच्या स्वातंत्र्ययुद्धातील योगदानाबद्दल माहिती याठिकाणी नमूद केली आहे. या जेलमध्ये ६९४ कोठड्या आहेत. या जेलच्या टेरेसवरून भारतीय समुद्रतटाचा नजारा अतिशय सुंदर दिसतो. समुद्राच्या किनाऱ्यालगत हा तुरुंग असल्यामुळे कुणीही येथून पळू शकत नव्हते म्हणून ब्रिटिशांकरिता हा जेल महत्वाचा होता. या टेरेसवरून समुद्राचे पाणी काहीसे काळ्या रंगाचे दिसते म्हणूनच येथील कारावास शिक्षेला काळ्या पाण्याच्या शिक्षा म्हटले जायचे.
अंदमानला गेल्यावर आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही वॉटर ऍक्टिव्हिटी ठेवणार आहोत एक म्हणजे स्कुबा डायविंग आणि दुसरी वॉटर स्नोर्कलिंग. थ्रिलिंग स्कुबा डायविंग करण्यासाठी तुम्हाला स्विमिंग आलेच पाहिजे असे बिलकुलहि नाही. स्विमिंग न येणाऱ्यांना देखील स्कुबा डायविंगचा आनंद घेता येतो. पाण्यामध्ये गेल्यावर तुम्हाला एक वेगळीच दुनिया पाहायला मिळते, वेगळ्या जीवांची वेगळी दुनिया अनुभवायची असेल तर स्कुबा डायविंग करणे गरजेचे आहे. स्नोर्कलिंग वॉटर ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही तुम्हाला एक जॅकेट आणि एक गोल आकाराची ट्यूब देणार आहोत ज्यामूळे तुम्ही पाण्याच्या वरच्या भागावर तुम्ही अलगद तरंगू शकाल. पाणी स्वच्छ असल्यामुळे तुम्ही माश्यांसोबत देखील खेळू शकता किंवा माशांना जवळून बघू शकता.
हे भारतातील नव्हे तर जगातील टॉप वन बीच आहे. जगातील ५ व्या क्रमांकाचे लोकप्रिय बीच आहे. खरोखरच बीच एन्जॉय करायचे असेल तर हॅवलॉक टापूवरील या राधानगर बीचला अवश्य भेट द्या. अत्यंत साफ आणि निळेशार पाणी या बीचवर आहे. असे वाटते कि आपण कुठल्या फॉरेन बीचवर आहोत.फार लोकांना याबद्दल माहिती नसल्याने हे व्यवस्थितरीत्या असल्याचे म्हटले जाते. फार साफ असल्यामुळे जागतिक पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. येथे तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत आनंद घेऊ शकता. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे.