Blogs

हनिमून स्पेशल आणि हटके बनवायचा असेल तर नक्की वाचा!

हनिमून स्पेशल आणि हटके बनवायचा असेल तर नक्की वाचा!

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard

October 16, 2019

Ranjana Kokane

कुठं कुठं जायचं हनिमूनला…! लग्न तुमचं लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज, कसही असो काही फरक पडत नाही; पण हनिमून असलाच पाहिजे हे प्रत्येकाचं लग्नाआधीच आणि नंतरचं देखील स्वप्न! आताच्या पोस्ट- मॉडर्निटीमध्ये हनीमूनशिवाय लग्नाची गंमत कळत नाही, असे समीकरण आहे त्यामुळे हनिमून झालाच पाहिजे हे घरातल्या छोट्यांपासून ते अगदी थोर व्यक्तींपर्यंत सगळ्यांकडून सांगितले जाते. जसजसे पर्यटन विकसित होत गेले तसतसे हनीमून संकल्पनेच्या कक्षा देखील विस्तारत गेल्या आहेत. पूर्वी हनिमून म्हटलं कि इकडे जायचं, तिकडे जायचं असं ठिकाणांबद्दल जास्त चर्चा असायची, आताही ती गोष्ट तितकीच महत्वाची मानली जाते परंतु ठिकाणांबरोबरच इतर अनेक गोष्टी आवर्जून लक्षात घेतल्या जातात. हनिमूनसाठी चांगले ५ स्टार किंवा त्यापेक्षाही जास्त स्टार असलेले हॉटेल पाहिजे. कारण हनिमून म्हटलं कि ”मी आणि माझा मधुचंद्र” एवढेच डोक्यात असते. दोघेही एन्जॉय करू शकतो असे वातावरण असणे आवश्यक वाटते. त्यामुळे दोन पैसे जास्त खर्च करण्याची तयारी आजची पिढी ठेवते. या विचाराबरोबरच आपल्या पार्टनरला सर्व सोयीसुविधा, सुरक्षितता, पर्यटनस्थळाची वैशिष्ट्यपूर्णता आणि दिल्या जाणाऱ्या पैशांचे पुरेपूर वापर होईल असे मिळणारे पॅकेज याचे भानदेखील आजची पिढी ठेवते.

लोकप्रिय हनिमून ठिकाण, तेथील सुरक्षा आणि सुविधा हे जरी प्राथमिकतेने महत्वाचे असले तरी आपली हनिमून ट्रिप ही वेगळी आणि चिरकालीन संस्मरणीय असावी ही प्रत्येक जोडप्याची इच्छा आणि तगमग असते. पूर्वी हनीमूनच्या ठिकाणी सुंदर निसर्ग, पक्षी, प्राणी, गार्डन असे एक मनोरंजनात्मक स्वरूप असायचे परंतु आता त्याला मोठ्या प्रमाणात रोमॅंटिक रूप पाहायला मिळते. तसेही या सर्व कल्पना आपण फिल्म मधूनच घेतल्या आहेत; पण ते एन्जॉय करणे हे मात्र आता सर्वसामान्य बनले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा हनिमूनचा पीक सिझन मानला जातो त्यामुळे इज इंडिया ट्रॅव्हल ने हाच कालावधी तुमच्यासाठी ऑफर केलेला आहे

हनिमून म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांचे एकांत क्षण असतात. नव्या आयुष्याची सुरुवात असते. एकमेकांना आनंदाने जाणून घेण्याचा कालावधी असतो. नेहमीपेक्षा नवीन ठिकाणी जाऊन, नवीन गोष्टी करून नवा आनंद व्यक्त केला जातो. त्यासाठी रोमँटिक वातावरणाची गरज असते. तसे बघितले तर ठिकाणे हि निसर्गतः ठिकाणे ही रोमँटिकच असतात; परंतु त्याव्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी प्लॅन कराव्या लागतात ज्यामुळे तुमचा हनिमून हा आयुष्यात कायम लक्षात राहणारा बनतो.

आत्ताची तरुणाई हि करिअरिस्टीक आहे, त्यामुळे ‘मिनिमून’ ही संकल्पना देखील उदयाला आली आहे. दोघेही दिवसरात्र काम करत असतात. कधीकधी प्रोजेक्ट निमित्ताने वेगवेगळेही राहतात त्यामुळे एकमेकांसोबत एकांत वेळ मिळणे फार अवघड होऊन जाते. मग चीडचड, भांडणे होतात आणि नंतर मिनी हनीमूनचा प्लॅन होतो आणि तो गरजेचा असतो कारण खूप दुरावा निर्माण झालेला असतो. मग एका आठवडाभराची सुट्टी घेऊन जवळच्या ठिकाणी प्लॅन तयार केला जातो. असे प्लॅन देखील अगदी ग्लॅमरसली आकर्षकरित्या सेलिब्रेट करता येतात. अगदी तुमच्या पहिल्या हनीमूनपेक्षाही सुंदर आणि चिरकालीन डोळ्यांसमोर राहील अशा प्रकारचे प्लॅन्स आमच्याकडून ऑफर केले जातील.

हल्लीच्या हनिमून ट्रीपमधील दिखावा देखील खूप वाढला आहे. पर्यटन स्थळाबरोबरच हॉटेलची नावीन्यपूर्ण रचना, तेथील वातावरण, प्रत्येक खिडकीतून दिसणारा व्ह्य़ू, कॅण्डल लाइट डिनर वगैरे गोष्टींचं महत्त्व कमालीचं वाढलं आहे. त्यामुळे लॅविश पंचतारांकित हॉटेल्स, तेथील सोयीसुविधा, कँडल लाईट डिनर, आकर्षक आणि स्वादिष्ट केक, वाईन बॉटल्स या गोष्टी देखील हनिमूनसाठी आता सामान्य बनायला लागल्या आहेत.

आयुष्यात ज्यांनी कधी वाईन घेतली नसेल तेसुद्धा हनिमूनच्या ठिकाणी या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी सरसावलेले असतात. त्यांना आपल्या पार्टनरसोबत या गोष्टींचा आनंद आणखी रोमँटिक बनवतो आणि आनंद देतो. ही आजच्या तरुणाईची लाईफस्टाईल आहे. इज इंडिया ट्रॅव्हलने देखील अशाच प्रकारचे स्पेशल हनिमून पॅकेज तुमच्यासाठी आणले आहे. ज्यामध्ये तुम्ही आपल्या पार्टनरसोबत भारत आणि भारताबाहेरील हटके नयनरम्य अशा अनेक ठिकाणी हनिमूनसाठी जाणार आहात. येथे पंचतारांकित हॉटेल्स, सुंदर, आकर्षक आणि आधुनिक सोयीसुविधांयुक्त असे रूम्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. चंदेरी रात्रीत अगदी चंद्राबरोबर आणि चांदण्यांच्या वर्षावामध्ये, वाऱ्याच्या हळुवार झोक्यांवर तुमचा कँडल लाईट डिनर असणार आहे. स्वादिष्ट जेवणाबरोबर स्वीट केक आणि वाईन देखील ऑफर केली जाईल त्यामुळे तुमचा हनिमून एक अभूतपूर्व आणि अविस्मरणीय बनणार आहे. दिवसभर तुम्ही नयनरम्य अशा ठिकाणी फिरणार आहात आणि तुमचे रंगतदार, कधीही न विसरणारे क्षण तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता यावे म्हणून एक प्रोफेशनल फोटोग्राफर देखील दिला जाणार आहे, जो तुमचा हनिमून एक हटके लव्हस्टोरी बनवेल, जी दाखवायला आणि बघायला तुम्ही नेहमी हर्षित असाल. आहे कि नाही लव्हबर्ड सारखा अभूतपूर्व रोमँटिक अनुभव! चला तर मग हे पॅकेज लवकरात लवकर फायनल करा आणि तुमचा हनिमून स्पेशल बनवा.

easeindia

Share
Published by
easeindia

Recent Posts

पशु-प्रेमियों के लिए केरल: अपने प्यारे साथी संग अविस्मरणीय छुट्टियाँ

अगर आप उन यात्रा के शौकीन लोगों में से हैं जिन्हें अपने प्यारे पालतू जानवर…

1 month ago

तंज़ानिया: परिवारों और वरिष्ठ नागरिकों के लिए एक अविस्मरणीय अनुभव

जब बात छुट्टियों की आती है, तो अक्सर हम ऐसी जगह की तलाश करते हैं,…

1 month ago

Top 5 Tips to Prevent Acute Mountain Sickness & Know Ladakh Altitudes

Acute mountain sickness (AMS) in Ladakh can...

3 months ago

Anini Arunachal Pradesh: The Best Summer Getaway in 2025

Anini remains largely off most travelers...

3 months ago

लद्दाख यात्रा: “एंक्यूट माउंटेन सिकनेस (AMS)” से कैसे बचें?

लद्दाख की पहाड़ियाँ, वादियाँ, ठंडी-नरम हवाएँ और अद्भुत नज़ारे हर...

4 months ago

Standing Seats on Aircrafts

The latest “innovation” for air travel are...

4 months ago