लडाखमध्ये ३ दिवसांची कारगिल टूर, का? ते आत्ताच जाणून घ्या!
काश्मीर भारताचा स्वर्ग मानला जातो; परंतु काश्मीर घाटीपेक्षाही कारगिल सुंदर असल्याचे म्हटले जाते. कारगिल म्हटले कि पहिल्यांदा आपल्या डोक्यात कारगिल युद्धाचे चित्र उभे राहते. परंतु सध्या लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनल्यामुळे तेथे पर्यटनाचे द्वार खुले झाले आहे. हे नयनरम्य ठिकाण एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनावे यासाठी सरकारकडून अनेक सवलती देखील देण्यात आल्या आहेत. दरवर्षी साधारणतः सव्वालाख पर्यटक येथे भेटी देतात.
कारगिलमध्ये पोहचल्यानंतर कोण- कोणती ठिकाणे पाहणार?
कारगिल हा द्विअर्थी शब्दसमूह आहे. खार म्हणजे महाल आणि रकील म्हणजे केंद्र याचा अर्थ महालांमधील किंवा राजवाड्यांमधील एक ठिकाण आहे. जे भारत आणि पाकिस्तानच्या मधोमध आहे. कारगिल हे निरनिराळे मठ, सुंदर नयनरम्य दऱ्या आणि छोटी छोटी टुमदार शहरे यासाठी प्रसिद्ध आहे. बौद्ध धर्मीय शरगोल मठ, सनी मठ आणि मूलबेख मठ येथील महत्वाची आकर्षण स्थळे आहेत.
शरगोल मठ
कारगिल पासून काही अंतरावर हे ठिकाण आहे. बुद्धाची भित्तिचित्रे येथे पहावयास मिळतात. येथील अवलिकेतेश्वर मंदिरामधील ११ हातांच्या हत्तीचे शिल्प लोकप्रिय आहे. याशिवाय तिबेटियन लोकांनी बनविलेली तारादेवीची लाकडी मूर्ती देखील अतिशय सुंदर आहे.
कानिक स्तूप
सानी गावाच्या नावावरून याला सनी मठ असेही संबोधले जाते. याठिकाणी अनेक बौद्ध गुरूंनी भेटी दिल्या आहेत. कुशाण राजा कनिष्काने हा मठ बांधलेला आहे. त्यामुळे येथे १०८ स्तूपांपैकी कनिका स्तूप देखील येथे आहे. मूलबेख मठातील मैत्रेय बुद्ध किंवा लाफिंग बुद्ध देखील एक आकर्षक ठिकाण आहे. उंच अशा खडकावर हा मठ बांधलेला आहे. येथील ९ मीटर उंचीची भगवान बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी देश – विदेशातून लोक येतात.
झास्कर पर्वतरांग
भूगोलामध्ये हिमालयीन रांगांमध्ये झास्कर पर्वतरांग आपण सर्वानी वाचलीच असेल तर ही कारगिलमध्ये आपण पाहणार आहोत. झास्कर हे येथील एका जिल्ह्याचे नाव देखील आहे. अनेक पर्यटक खास करून हा परिसर बघण्यासाठी, फिरण्यासाठी येथे येतात. त्यामुळे निसर्गप्रेमींचे हे लोकप्रिय ठिकाण मानले जाते. झास्कर पर्वतरांगेचा हा भाग वर्षातील ८ महिने बर्फाने झाकलेला असतो. द्रांग -द्रुन्ग ग्लेशियर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. करसा मठ, जोंगखूल मठ, स्टॅगडे मठ याठिकाणी आहेत. करसा मठ येथील सर्वात मोठा मठ असून लोकप्रिय देखील आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा तो अव्वल मठ आहे. १५० बौद्ध भिक्षुक येथे एका वेळी राहू शकतात. या मठामध्ये चोमो आणि गोम्पा आश्रम आहे.
श्रीनगर
लेह पासून ५ किमी अंतरावर ग्रास नदी आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर डोळ्यांना सुखावतो. हरदास गावाच्या जंगलामध्ये सफेदा आणि खुमानी नावाची वृक्ष आढळतात. याच रस्त्याने कारगिलकडे जाताना उंच ऐतिहासिक भिंत लागते जी संरक्षणाकरिता बांधण्यात आली होती. त्यानंतर द्रास नदी परिसर येतो जो पाकिस्तानलगत आहे. द्रास नदी आणि डाव्या बाजूने वाहणारी सुरु नदी पुढे पाकिस्तानमध्ये वाहत जातात या ठिकाणाहून अतिउच्च आणि बर्फाळ टायगर हिलचा नजारा अतिशय सुंदर दिसतो. येथील उंच पर्वतरांगांवर पॅराग्लायडिंग साठी संधी आहेत. कारगिलपासून ११ किमी अंतरावर, ५०० वर्षांपूर्वीचे हुंदरमान गाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते कारण ते अगदीच भारत पाकिस्तान सीमेवर उंच डोंगरदारीमध्ये आहे. कारगिल युद्धापर्यंत येथे पाकिस्तानचे अस्तित्व होते . येथे भारतीय फौजींचे तळ आहे. या ठिकाणी दोन भावांनी मिळून अनेक घरे बांधली आहेत जे एक ऐतिहासिक वास्तूकलेचे उत्तम नमुने ठरतात. तेथील पर्वतांना अनुसरून त्याची बांधकाम रचना आहे आणि विशेष म्हणजे ही १८-२० घरे जमिनीच्या आतूनच एकमेकांशी संलग्न आहेत त्यांच्या आजूबाजूला शेती आहे आणि विशेष म्हणजे या घरांचा वापर केवळ उन्हाळ्यातच केला जातो, असे सांगितले जाते.
कारगिल वॉर मेमोरियल
१९९९ मध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताचे ५५९ जवान शहीद झाले होते तर याच शहिदांच्या स्मरणार्थ हे मोमोरिअल बांधलेले आहे. येथील वीरभूमीवर त्या सर्व शहिदांची नावे येथे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत. कारगिल युद्धावेळी वापरण्यात आलेली युद्धसामग्री जसे की, विमान, बंदुक देखील प्रतिमा स्वरूपात ठेवण्यात आलेली आहे. युद्धावेळी जे कमांडर्स चीफ होते त्याचे फोटो हे भारताचे हिरो म्हणून दाखवण्यात आलेले आहेत . तसेच युद्धावेळी पाकिस्तानकडून जी युद्धसामग्री वापरली गेली ती देखील पाकिस्तानमधून झालेल्या घुसखोरीचा पुरावा म्हणून ठेवण्यात आली आहे. जेथे भारत पाकिस्तानचे युद्ध घडले त्या टायगर हिल आणि रायन हिल या दोन्ही टेकड्या या ठिकाणाहून स्पष्टपणे दिसतात.
अशी ही वैविध्यपूर्ण ठिकाणे तुम्हाला एका आकर्षक पॅक मध्ये आम्ही ऑफर करत आहोत. येत्या काही दिवसातच तुम्हाला या सर्व ठिकाणाची सैर करायला मिळणार आहे. सर्व सोयी सुविधा या ट्रीपदरम्यान पुरविल्या जाणार आहेत, या रोमांचक सहलीची बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा आणि सहलीचा आनंद घ्यायला तयार रहा
Ranjana Kokane November 12, 2019