लग्न झाले, हिवाळा आला, हनिमूनला चला केरळला!
प्रवास तुमच्या आयुष्यात केवळ सकारात्मक विचार आणि प्रेम घेऊन येतो. काही दिवसांपूर्वीच तुळशी विवाह झाला आहे. त्यामुळे लग्नसराई सुरु झाली आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. खूप तरुण – तरुणांची दिवाळीनंतर लग्न झालेली आहेत आणि त्यात हिवाळा पण सुरु झाला आहे त्यामुळे लग्न झालेल्या व्यक्तींना हनीमूनचे डोहाळे लागलेले असतात. साहजिकच, लग्नानंतर प्रत्येक जोडीदाराला एकमेकांचा टाइम पाहिजे असतो. दोघांनी एकांतात एकत्रितपणे वेळ दिला तरच ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊन शकतात. प्रत्येकाला वाटते कि या दुनियेपासून दोघांनी कुठेतरी दूर रोमांचक ठिकाणी, फक्त दोघांनी प्रेमाचे क्षण साजरे करावे. कधीकधी तर वेळही मिळतो पण ठिकाण शोधणे कठीण होते. कुठे जायचे हे लवकर लक्षात येतच नाही. तसं बघायला गेलं तर खूप सारे कपल्स लग्नानंतर परदेशी जातात हनिमून साजरा करायला, पण अशीच सुंदर ठिकाणे आपल्याच देशात असतील तर… हो तर अशाच काही भारतातील बेस्ट हनिमून डेस्टिनेशन बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचा हनिमून अधिक स्पेशल आणि रोमँटिक बनणार आहे.
मुन्नार
केरळ भारतातील एक हनिमून डेस्टिनेशन आहे. केरळला देवांचा स्वर्ग समजला जातो कारण तेथे हिरव्यागार डोंगररांगांमध्ये प्रकृती जणूकाही अंघोळ करत आहे असे वाटते. जर केरळ साक्षात भगवान असेल तर मुन्नार पर्यटन स्थळ तेथील भगवान आहे. हिरवीगार जंगल समृद्धी, सुंदर झरे, विविध रासलीला करण्यासाठी हाऊस बोटिंग आणि इतर ऍक्टिव्हिटी देखील आहेत. मुन्नारला केरळचे काश्मिरदेखील म्हटले जाते कारण मुन्नार ठिकाण एक बेस्ट रोमान्स प्लेस समजले जाते. केरळ मधील अलपूझा येथे मुन्नार हे ठिकाण आहे . २०१७ मध्ये एका मॅगझीन ने या ठिकाणाला ”बेस्ट प्लेस ऑफ रोमान्स” ‘किताब मिळाला आहे. केरळ पर्यटन निर्देशक बी बाला किरण ने नुकताच अभिनेत्री डायना पेंटी सोबत नुकताच हा ‘किताब दिला आहे. मुन्नार एक आकर्षक पर्वतीय स्थळ आहे. हजारो पर्यटक येथे प्रतिवर्षी येतात. मुन्नार ला जाण्यासाठी कुठलीही रेल्वे नाही किंवा फ्लाईट नाही कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून तुम्हाला ट्रॅव्हल्स ने जावे लागते. ४ तासामध्ये तुम्ही मुन्नार ला पोहचू शकता. समुद्रसपाटीपासून साधारणतः १७००० मी उंचीवर मुटूपेट्टी ठिकाण आहे. झाडाझुडुपांनी बहरलेले, झऱ्यांनी खळखळणारे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीचे आहे. येथे चहाचे मळे खूप मनमोहक आहेत. या ठिकाणी भेटणारा एकांत प्रत्येक जोडप्याला हवाहवासा वाटतो या ठिकाणी ते अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतात. निसर्गाचा आणि आपल्या साथीदाराच्या प्रेमाचा आस्वाद भरभरून घेऊ शकतात. मुन्नारमध्ये टी म्युझिअम आहे. टाटा टी तर्फे संचलित हे म्युझिअम आहे. १८८० पासून या संग्रहालयात चहा उत्पादनाची सुरुवात झालेली आहे. चहा ची सर्व प्रक्रिया तुम्ही येथे जवळून बघू शकता. चहाच्या मळ्यामधून उंच झाडांच्या रांगा, हिरवे डोंगर आणि बाजूला वाहणारे झरे अशी रोमँटिक नैसर्गिक रचना येथे कपल्स एकांताकरिता अनुकूल आहे .
अलेप्पी
केरळमधील संथ बॅकवॉटर सोबत हाऊस बोटीमध्ये आपल्या जीवनसाथी सोबत एकांतात वेळ घालवणे यापेक्षा अधिक रोमँटिक काही असू शकत नाही. पाण्यामध्ये सुंदर क्षण साजरे करायचे असतील तर केरळमधील अलेप्पी व्यतिरिक्त दुसरे सुंदर ठिकाण कुठेही नाही. केरळमध्ये जर सर्वात खास ठिकाणी जायचे असेल तर सर्वात उंचीवर अलेप्पी हेच ठिकाण आहे. अलेप्पी खास करून हाऊस बोटींगसाठी ओळखले जाते. हाऊस बोटीची रचना हि लाकडाची आहे. त्यावर पारंपरिक सांस्कृतिक कलाकुसर करून मोहक बनविली आहे. हाऊस बोटींग मध्ये उत्कृष्ट बेडरूम्स, आधुनिक शौचालय, सुंदर लीविंग रूम, किचन तसेच बाहेरील दृश्य बघण्यासाठी गॅलरी देखील असते. हे नजारे बघण्यासाठी येणाऱ्या कपल्ससाठी अधिक हाऊसबोट जोडून बोट ट्रेन बनविली जाते जेणेकरून कपल्स ला डिस्टर्ब् होणार नाही आणि जास्तीत जास्त एकांत मिळतो. एकदम संथ गतीने ही बोट हळुवार पुढे जाते. त्यामुळे या प्रवासाचा आनंद वेगळाच असतो प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये सामावून घेतल्यासारखी वाटू लागते आणि स्वर्गात सफारी केल्याचा आभास होतो. येथे समुद्राव्यतिरिक्त अंबालापुक्षा श्री कृष्ण मंदिर, कृष्णापुरम पॅलेस , मरारी समुद्र किनारा ठिकाणे फिरण्यासाठी अतिशय सुंदर आहेत. येथे एकांतात तुम्ही तुमच्या जीवनाची प्रेमळ सुखद सुरुवात करू शकतात.
Ranjana Kokane December 19, 2019