Top
  >  Blog Featured   >  केरळमधील ही ५ लक्झरी ठिकाणे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील!

केरळमधील ही लक्झरी ठिकाणे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील!

आयुष्य खूप लहान आहे आणि जग खूप मोठे त्यामुळे फिरा आणि अनुभव साठवा, कारण आयुष्यात तेच कामी येणार आहेत.नेहमी फक्त शाळा- घर, घर-शाळा असाच प्रवास केला आाता काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे. आपण प्रवास करतो दूर जाण्यासाठी नाही तर आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी. नोकरी तुमचा खिसा भरते.. तर प्रवास तुमच्या आयुष्यात आठवणी. चला तर मग आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे केरळच्या भूमीत एका नवीन प्रवासासाठी, नवीन जीवन आणि नव्या आठवणी निर्माण करण्यासाठी!

  • क्वाईट बाय द रिव्हर
  • ग्रँड हयात, कोची बोलघट्टी
  • कुमारकोम लेक रिसॉर्ट
  • सोमथिरम आयुर्वेद व्हिलेज, कोवलम
  • पूल विला, व्यथिरी व्हिलेज

प्रथमतः केरळला का जायचे ?

जर तुम्ही शांत आणि निसर्गाने नटलेल्या ठिकाणी फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर केरळ एक बेस्ट ठिकाण आहे. जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. केरळला देवभूमी म्हटले जाते. केरळ म्हटल्यावर डोळ्यासमोर येत नारळाच्या हिरवगार बागा, फेसाळलेले सागरकिनारे, पाण्यावर तरंगणाऱ्या हाउसबोट, कोरीव शिल्पांची पुरातन मंदिरे, हत्ती, अनेक आयुर्वेदिक वनस्पतीयुक्त अश्या निसर्गदेणगी असलेल्या व समृद्धता लाभलेल्या केरळला ‘God’s Own Country’ म्हणतात ते उगाच नाही. कन्याकुमारी पासून कोचिन पर्यंतचं तुमचं एखादं आवडतं शहर निवडा आणि दोन-चार दिवस भटकून या. केरळचे मसाले, केळ्याचे वेफर्स, सिल्कच्या साड्या यांची शॉपिंग करायला मुळीच विसरू नका.

केरळमध्ये पोहचल्यावर तुम्ही कुठे राहू शकता ?

क्वाईट बाय रिव्हर

हे एक लॉज आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील पाणियेलीं पोरु या ठिकाणी हा भव्य लॉज आहे. अगदी केरळमधील प्रसिद्ध पेरियार नदीकिनारी हि लक्झरी वास्तू आहे. हे कमर्शियल रिसॉर्ट असून दोन कॉटेजेस हे दगडी बांधकाम तर दोन लाकडी बांधकामे करून अतिशय सुंदर आणि मनमोहक बनवलेली आहेत. या रिसॉर्ट मधून हिरव्यागार टेकड्या तसेच वाहणाऱ्या नदीचा देखावा खरोखर मंत्रमुग्ध करतो. रिसॉर्टमध्ये मुबलक जागा आणि प्रायव्हसी जास्त आहे त्यामुळे निर्धास्त राहता येते. वातानुकूलित रूम्स, वेकअप सर्व्हिस, गरम – थंड पाण्याचे बाथरूम्स आणि शॉवर्स, आधुनिक टॉयलेट्स, कपडे ठेवण्यासाठी रॅक, नाश्ता आणि जेवणाची सोय, स्विमिंग पूल आणि मसाज सेंटर अशा सर्व लक्झरी सोयी या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखकारक होईल.

ग्रँड हयात, कोची बोलघट्टी

कोचीमधील हे सर्वात ग्रँड लक्झरी हॉटेल आहे. हे ग्रँड हॉटेल वेम्बनाड तलावाच्या बाजूला आहे. सुंदर तलाव आणि कोची शहराचा मनमोहक नजारा ह्या हॉटेलमधून तुम्ही बघू शकता. पोहण्यासाठी तुमच्या रूमच्या बाजूलाच निळेशार तलाव आहेत जिथे तुम्ही मनसोक्त डुबकी मारू शकता. फिटनेससाठी जिमची सुविधा २४ तास आहे. पर्सनल ट्रेनर देखील तुमच्यासाठी तैनात केलेले आहेत.आधुनिक लायब्ररीयुक्त लॅविश बिजनेस सेंटर देखील आहे जिथे तुम्ही तुमच्या ऑफिशिअल मीटिंग्ज सुद्धा घेऊ शकता. आऊटडोअर पूल तर फारच सुंदर आहे अगदी पॅरिसला आल्याचा भास होतो. पूल च्या बाजूला छानसे गार्डन आहे. या तलावात डुबकी मारून सूर्याच्या किरणांचा तसेच आजूबाजूच्या गार्डनचा, निसर्गाचा आनंद तेथील स्विमिंग बेडवर घेऊ शकता. आयुर्वेदिक स्पा देखील या हॉटेलमध्ये आहेत ज्यामुळे तुमचे शरीर मन आणि आत्मा यांना खरोखरची शांती आणि आनंद मिळेल. डायनिंग साठी देशी विदेशी सर्व प्रकारचे पदार्थ बनविले जातात. त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी ट्राय करू शकता. रूम्स तर इतके सुंदर आहेत कि ज्याची तुम्ही कल्पनादेखील केली नसेल किंग साईझ बेडरूम असून, वाक इन वॉर्डरोब आहेत, प्रायव्हेट बाल्कनी आणि टेरेस असून बाल्कनीबाहेरील प्रसन्न दृश्ये देखील मनमोहक आहेत.

कुमारकोम लेक रिसॉर्ट

हे एक लक्झरी हॉलिडे रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते. सुंदर विलाज असून ते अगदी आधुनिक परंतु परंपरेची झाल त्यांना दिसून येते म्हणजेच परंपरेत आधुनिकता रचल्याचा नमुना तुम्हाला येथे बघायला मिळेल. लक्झरी रूम, अत्याधुनिक सोयीसुविधा, प्रायव्हेट पूल यासोबतच हाऊसबोटिंगची सुविधा देखील आहे. आयुर्वेदिक ब्युटी ट्रीटमेंट आणि डॉक्टरांशी सल्ला मसलत देखील करण्याची सुविधा देखील आहे. येथील समुद्रीफूड आणि पारंपरिक चहा कॉफी खूप टेस्टी आहे. कॉन्फरन्स रम, बिजनेस सेंटर, फिटनेस सेंटर, इंटरनेट सुविधा, स्विमिंग पूल, लेक ऍक्टिव्हिटी अशा सर्व लॅव्हिश सुविधांयुक्त हे रिसॉर्ट आहे.

सोमथिरम आयुर्वेद व्हिलेज, कोवलम

जगातील पहिले आयुर्वेदिक रिसॉर्ट म्हणून ह्याची ओळख आहे. जागतिक स्तरावरील पुरस्कार या रिसॉर्टला दिले गेले आहेत. केरळमधील आयर्वेदिक थेरेपी, योगा, आणि शांतीदायक वातावरण या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. येथील रिसॉर्टचे दोन प्रकार आहेत. एक हेरिटेज आयुर्वेद रिसॉर्ट आणि दुसरे केरळ ग्रीन लीफ आयुर्वेद रिसॉर्ट. येथे तुम्हाला राहण्यासाठी कॉटेजेस, रूम्स आणि सूट्स देखील उपलब्ध आहेत. बाजूलाच गार्डन्स आणि समुद्रदर्शन देखील आहे.आयुर्वेदिक थेरेपीसोबत तुम्हाला डॉक्टरांचे गाईडन्स आणि त्यांच्या सल्ल्यानुसार थेरेपी दिल्या जातात, त्यामुळे तुमचे मन शरीराची आयर्वेदिक आणि नैसर्गिक पद्धतीने देखभाल या ठिकाणी होते.

पूल विला, व्यथिरी व्हिलेज

वायनाडमधील एक रोमँटिक राहण्याचे ठिकाण म्हणून या हॉटेलची ओळख आहे. येथील पॅव्हिलियन रूम्सची सजावट आणि मोहक वातावरण कधीही विसरता येणार नाही. हॉटेलमधील पूल, पॅन्ट्री जागा, स्वादिष्ट नाश्ता – जेवण, कॉफी, टीव्ही, लाँड्री, इंटरनेट आणि इतर रूम सर्व्हिस अशा लक्झरी सुविधा येथे अनुभवायला मिळतील. ३६० व्हिव चे कॉटेजेस, प्रायव्हेट पूल आणि जाकुजी टब अत्याधुनिक सुविधा देखील आहे. येथे फोटो तुम्ही छान क्लिक करू शकता.

वरील पाचही लक्झरी ठिकाणे इज इंडिया ट्रॅव्हल तुम्हाला विशेष पॅकेजमध्ये ऑफर करत आहे तर विलंब कसला ? आजच संपर्क साधून बुकिंग करा आणि आनंद घ्या ह्या लक्झरी जीवनाचा!

Ranjana Kokane December 7, 2019