प्राचीन काळापासून हिमालयात वसलेले कारगिल हे उदयॊग व्यवसायाचे केंद्र होते. उत्तरेकडील देशांचा भारताशी होणारा व्यापार देखील कारगिल द्वारे होत असे त्यामुळे येथे उद्योग व्यवसायाचे केंद्र होते. आजही येथील पश्मिना कपड्याच्या शाली, चटया आणि लाकडी वस्तू देश – परदेशात लोकप्रिय आहेत. येथील लोक आणि संस्कृती बघायची असेल तर नक्की भेट द्या कारण एक विशिष्ट आणि आगळीवेगळी लोकसंस्कृती येथे आहे. येथील मिनारोज समुदाय लोकांचे जीवन आश्चर्यकारक आहे. हे लोक रंगीबेरंगी लोकरीचे विणलेले उबदार कपडे घालतात. डोक्यावर एक टोपी घालतात ज्यामध्ये फुले आणि रिबन सुंदररित्या खोचलेली असते. याठिकाणी येणारे पर्यटक स्वतःसाठी तसेच आपल्या नातेवाईकांसाठी येथील न्यू पॅटर्नचे आकर्षक हातांनी विणलेले कपडे आवर्जून घेऊन जातात. तुम्ही जुने कारगिल बघितले तर येथील बिल्डींग्स आणि मार्केट नक्की बघा कारण सर्व जुन्या काळातील गृहरचना आणि बाजारपद्धती अजूनही जशीच्या तशी आहे. जुन्या कार्गिलमधील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे येथे मुस्लिमांची मस्जिद आणि शिखांची गुरुद्वारा एकाच इमारतीत आहेत भिंतीच्या एका बाजूला अल्ल्हाची नमाज तर भिंतीच्या दुसऱ्या बाजूला शिखांची प्रार्थना. म्हटले जाते हे पवित्र स्थान मुस्लिम आणि शीख लोकांनी एकत्र येऊन बांधली आहे. खरोखरच बंधुभावाची शिकवण देणारी हि इमारत आपण बघितली पाहिजे. कारगिलचा ट्रॅडिशनल पुरगी आणि दर्दी इथनिक डान्स लोकप्रिय आहे.