काय आहे फॉरेस्ट बाथिंग ? अनुभवायचे असेल तर चला केरळ-वायनाड मध्ये!
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard
फॉरेस्ट बाथिंग म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल. जंगलात जाऊन अंघोळ करायची कि काय असं वाटलं असेल. परंतु फॉरेस्ट बाथिंग म्हणजे अगदी मुक्त होऊन निसर्गात वावरणे, स्वतःला निसर्गाशी जोडणे आणि निसर्गाचा एक भाग बनून एकरूप राहणे जे आपल्या आरोग्यासाठी हितवर्धक आहे. आपले शरीर हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे आणि आपल्या दैनंदिनीमध्ये आपण मूळ स्वच्छ निसर्गापासून दुरावलो आहोत. आपल्या शहरी जीवनात आपली पंचतत्वे कमजोर बनतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ तत्वाकडे काही काळ घेऊन जाणे हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या गरजेचे आहे. फॉरेस्ट बाथिंग म्हणजे आपले शरीर काही काळाकरिता ट्रीटमेंट म्हणून निसर्गाशी जोडला जाणे असे देखील म्हणता येईल.
निसर्गाला जोडणारी फॉरेस्ट बाथिंग ही संकल्पना मुळतः जपान सरकारच्या शेती, वन मत्स्य विभागाने १९८० च्या उत्तरार्धात जगाला माहिती करून दिली . ‘शिनरीं योकु’ असेही जपानी भाषेत म्हटले जाते. हळूहळू पाश्चात्य देशांनी देखील या गोष्टीचा अवलंब केला. साधारणतः सगळ्यांना वाटते कि जेव्हा आपण जंगल ट्रिप करतो त्यावेळी घामाने आपली अगदी आंघोळीच होते, मग ती अंघोळ तर नव्हे. पण तसे मुळात नाही आहे. फॉरेस्ट बाथिंग हा निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींचा संच आहे जो हळुवारपणे अनुभवायचा असतो, जगायचा असतो.


भारताच्या इतिहासात देखील घनदाट झाडाझुडपांमध्ये तपस्या करण्याची परंपरा होती याच पद्धतीची परंपरा आत्ताच्या काळात जपानने स्वीकारली आहे. जंगलामध्ये वृक्षांच्या सान्निध्यात काही वेळ मेडिटेशन करणे खूप आरोग्यदायी आहे. एका फ्रेंच शास्त्रज्ञाने सांगितले आहे कि निसर्गाच्या सान्निध्यात राहिले कि माणूस अधिक उदार बनतो आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक वाढते, जे सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी चिपको आंदोलन तर नुकतेच मुंबईतील आरे आंदोलन देखील मानव आणि निसर्गाला बांधणारे काही प्रमाणातील यशस्वी प्रयत्न आहेत.
फॉरेस्ट बाथिंग जीवन पद्धती जरी जपानने सुरु केली असली तरी सर्व मानवजातीला आज त्याची गरज आहे. भारतामध्ये जंगल मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सहजपणे तुम्ही फॉरेस्ट बाथिंग प्लॅन करू शकता. या प्लॅनसाठी इज इंडिया ट्रॅव्हल तुम्हाला मदत करत आहेत. केरळच्या निसर्गरम्य परिसरात वायनाड ठिकाणच्या जंगलात तुम्हाला ही ट्रिप अनुभवायची संधी आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसोविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
Recent Blogs

Why Should Grandmothers Only Go On Pilgrimages?

