दिवाळी संपली आणि थंडीला सुरवात झाली, थंडी हि नेहमी गुलाबी असते आणि गुलाबी थंडीचा आनंद खरंच गुलाबी करायचा असेल तर रोमँटिक बीचवर जाणे गरजेचे आहे, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील ऑफबीट ठिकाणांचा प्रवास घडवणार आहोत. ती ठिकाणे म्हणजे भारतातील सर्वात ग्लॅमरस बीच जसे कि
- गोवा
- अंदमान
- केरळ
- पॉंडेचरी.
दक्षिण भारतातील हि एव्हरग्रीन ठिकाणे देशी विदेशी पर्यटकांना फारच लुभावणारी आहेत. बीचवर फिरायला जायचं म्हटलं कि या सर्व ठिकाणची नावे आवर्जून घेतली जातात. चला तर मग पाहूया तुम्ही या बीचेस वर काय बघू शकता?
अंदमान
हे एक छोटेसे सुंदर द्वीप आहे. गर्दीपासून मनाला आनंद आणि शांती देणारे ठिकाण. हिवाळ्यातील सुट्ट्या आणि हनिमून करिता हे ठिकाणाला पसंती दिली जाते. अंदमान बीच एन्जॉय करायचे असेल तर सिंक व रीडस्कीन बीच, राधानगर बीच, एलिफंट बीच, विजयनगर बीच, काला पत्थर बीच आणि वंडर बीच या ठिकाणांना अवश्य भेटी द्या. राधानगर बीच जगातील ७ व्या क्रमांकाचे सुंदर बीच आहे. या बीचवर तुम्ही स्नोर्कलिंग, फिशिंगगेम, स्वीमिंग आणि स्कूबा डाइविंगचा मनमुराद आनंद लुटू शकता. अंदमानमधील जंगलमार्गे ३० मिनिटांच्या अंतरावर एलिफंट बीच पाहायला मिळेल. निळ्याशार पाण्याचा शांत किनारा तसेच समुद्री जीव आणि स्नोर्कलिंग ची मजा इथे अनोखी असते.बीचमधील पाणी हवेमध्ये उडण्याचा अनोखा नजारा तुम्ही विजयनगर बीचवर नक्की पाहायला मिळेल. स्विमिंग, बोटिंग, फोटोग्राफी, वॉटर सर्फिंग ची मौजदेखील या बीचवर लुटता येईल. येथे निसर्गाचे सौंदर्य देखील अप्रतिम आहे निळ्याशार किनाऱ्याच्या बाजूला महुआच्या वृक्षांची रांग एक दिलचस्प नजारा आहे. चांदीसारख्या चमकदार रेतीवर मस्ती करायची असेल तर काला पत्थर बीचवर जा. मस्त एन्जॉय कराल. महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क वंडर बीचवर आहे,समुद्री जीव येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच टेहळणीसाठी हा बीच सुंदर आहे.

गोवा
सर्वांच्या पसंतीचे नं १ ठिकाण म्हणजे गोवा. छोटयांपासून मोठ्यानपर्यंत सर्वांना गोव्याला जायचे असते त्यात हिवाळा म्हटला कि गोव्याला फिरायला जायचं हे जणू प्रत्येकाचं सुप्त प्रांजळ स्वप्न असतं. कारण हिवाळ्यामध्येच ख्रिसमस आणि न्यू ईअर सेलिब्रेशन असतात आणि ते सेलिब्रेट करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे गोवा. देश – विदेशातून पर्यटक स्पेशली हे उत्सव साजरे करण्यासाठी गोव्याला येतात. येथील समुद्र, चौपाटी, आल्हाददायक हवा, ड्रिंक्स, फ्रेंड्स, सर्वकाही स्वप्नवत असतं. हे सर्व तुम्हाला खुणवत आहे, स्वतःला रोखू नका तर आनंद घ्या. येथील दुधसागर अतिशय छान आहे. गोव्यातील शानदार चर्च, फोंटियाज, पालोलम बीच, अणजुणा बीच, वगातोर बीच, कोलम बीच हे बीचेस उत्तम आहेत.
केरळ
कन्नूर मधील पायमबलम बीच अतिशय सुंदर आहे, मुझप्पीलंगड ड्राइव्ह बीचवर तुम्ही गाडी घेऊन ड्रायविंग देखील करू शकता आणि जर तुम्हाला बोटिंगची मजा घ्यायची असेल तर व्ही प्रा कायल फ्लोटिंग पार्क बीचवर जाऊ शकता. कोझिकोड बीच, पायोली बीच थुशरगिरी धबधबा ही ठिकाणेदेखील पर्यटनासाठी महत्वाची आहेत. कोझिकोड बीचवर फिरण्याबरोबर तेथील स्थानिक स्वादिष्ट जेवणाचा स्वाद घेऊ शकता. दम बिर्याणी, दाल हलवा, कल्लू मुकाया हे मलबारी पदार्थ येथे लोकप्रिय आहेत. येथील बेकल बीच देखील सुंदर आहे. बेकल नावाच्या किल्ल्यावरून या बीचचे नाव ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक फिल्मचे चित्रीकरण करण्यात आले आहे. बॉलिवूड फिल्म ”रंग दे बसंती” ही अमीर खानची फिल्म या ठिकाणी चित्रित करण्यात आली आहे. अलेपी हे केरळातील सर्वात जास्त लोकप्रिय ठिकाण येथील हाऊसबोटिंग साठी प्रसिद्ध आहे तसेच निसर्गाशी जोडणारे ठिकाण आहे. अनेक पर्यटक फक्त या ठिकाणाला भेट देण्यासाठी केरळमध्ये येतात. अलेपीला पूर्वेकडील व्हेनिस शहर मानले जाते.

पॉंडेचरी
पॉंडेचरी या शहराला पूर्वेकडील फ्रांस देखील संबोधले जाते. येथील फ्रेंच सिटी बघण्यासारखी आहे. येथील पॅराडाईस बीच प्रेक्षणीय आहे. गेटपासून या बीचवर जाण्यासाठी तुम्हाला बोटीने जावे लागते. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा बीच आहे अगदी नावाप्रमाणेच स्वर्गात अवतरल्यासारखे वाटते या बीचवर पोहचल्यावर, त्यामुळे येथे नक्की भेट द्या. सरनीटी बीच हा सर्फिंग बीच आहे येथे सर्फिंग सेशन देखील असतात पाण्याच्या लाटेसोबत आपण देखील लाट बनून तरंगण्याची मजा तुम्ही या बीचवर घेणार आहात. या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर गवत आणि लाकडाच्या आकर्षक झोपड्यांमध्ये वास्तव्य करणे एक अद्भुत अनुभव आहे.