गिरीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी, भारतातील अतिउच्च पर्वतरांगांवर होणार धाडसी ट्रेकिंग सोहळा
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard
- easeindia
- April 11, 2025
आयुष्यात थ्रिलिंग गोष्टी घडाव्यात ही प्रत्येक तरुण मनाची इच्छा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण संधी शोधत असतो. रोजच्या दैनंदिनीचा कंटाळा आला कि निसर्ग हवाहवासा आणि गरजेचा वाटू लागतो, त्यावेळी फक्त डोंगर- पर्वतांची पहाट डोळ्यात होतेच आणि एव्हरेस्ट पार करून ‘कदमो में ये जहाँ’ म्हणत आकाशाला गवसणी घालावी असे वाटते. ऑक्टोबर सुरुवात झाली कि भारतातील युवा ट्रेकिंगच्या तयारीत असतो. ट्रेकिंग साठी अनोखी धाडसी जागा शोधणे, नयनरम्य देखाव्याची उंची ठिकाणे पाहणे, उंच थंडगार शिखरांवर अगदी स्वर्गानुभव घ्यावा असं प्रत्येकाला वाटते. भारतात ट्रेकिंग म्हटले कि आकाशाला गवसणी घालणारा हिमालय सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो. तेथील उंच शिखरांना आपल्या कवेत घ्यावे ही गिरीप्रेमींची सुप्त इच्छा असतेच आणि ही संधी लवकरच तुम्हाला देत आहे इज इंडिया ट्रॅव्हल. अगदी मार्च अखेर पर्यंत ट्रेकचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
भारताच्या हिमालयीन पर्वतरांगांचा विस्तार भारतामध्ये जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये आहे. जगातील सर्वांत उंच १२ शिखरांपैकी ९ शिखरे येथे आहेत. साधारणतः ७,३०० मी. पेक्षा अधिक उंचीची ३० शिखरे येथे आहेत. आयुष्यातील सुंदर आणि विलोभनीय क्षण अनुभवण्यासाठी, टिपण्यासाठी तुम्ही येथे नक्की भेट देऊ शकता. बर्फाळ मस्ती, हिरवा निसर्ग, सुंदर तळी, छनछन करत दिलखुलास नाचणाऱ्या लांबसडक नद्या, मनमोहक हवेचे झोके तुम्हाला या धाडसी ट्रेकवर चिरकालीन आनंद देतील. मार्च अखेरपर्यंत येथे तरुणोत्सव साजरा होत असतो, अनेक गिरीप्रेमी अगदी या ट्रेकच्या आनंदात आकंठ बुडून जातात. इज इंडिया ट्रॅव्हल तुम्हाला घेऊन जात आहे हिमाचल प्रदेश, कारगिल, लडाख, बस्तर, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश येथील उंच ठिकाणांवर दिलखुलास ट्रेकिंगसाठी.
लडाख

काराकोरम रांगेतील भारतातील सर्वोच्च के २ शिखर आणि नंगा पर्वत या ठिकाणी आहेत तसेच शाम दरी, मॅग्निटीक हिल, भारतीय आर्मीचा हॉल ऑफ म्युजिअम, सिंधू आणि झास्कर नदीचा सुरेख संगम देखील येथे अद्भुत आहे. खारगंगामार्गे नुब्रा दरी( व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ) हे सुंदर ठिकाण देखील येथे पाहावयास विलोभनीय आहे. पेंगोंग तळे या ठिकाणी लोकप्रिय आहे कारण इथे अनेक बॉलिवूड फिल्म चित्रित केलेल्या आहेत. ‘चादर ट्रेक’ हा हिमाच्छादित झास्कर नदीतील चॅलेंजिंग ट्रेक आहे . स्टॉक कांगरी ट्रेक हा भारतातील सर्वात ग्लॅमरस धाडसी ट्रेक मानला जातो, येथे ऑक्सिजनची कमतरता भासते त्यामुळे अगदी थ्रिलिंग असा हा ट्रेक स्पॉट आहे.

पँराग्लायडिंग ऍडव्हेंचर हा अविस्मरणीय अनुभव गिरीप्रेमींनी येथे नक्की घ्यावा. मनालीतील भृगु लेक विकेंड हायकिंगकरिता छान आहे . रुपीन पास ट्रेकिंग उत्तराखंडमधील धौला येथे सुंदर आहे . लांबसडक लाकडी पूल, या बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फवृष्टी आणि वितळणाऱ्या बर्फाचा मनमुराद आनंद घेणे मजेशीर आहे. अतिउंच अशा गरवाल पर्वतरांगांवर ट्रेकिंग करणे फार अवघड आहे त्यामुळे हा येथील सर्वात धाडसी ट्रेकिंग प्रयत्न मानला जातो.

ओडेन कोल ट्रेक हा देखील उत्तराखंड मधील वितळणाऱ्या बर्फातील धाडसी ट्रेक आहे. पिन पार्वती ट्रेक देखील अतिशय धाडसी ट्रेक असून यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असावी लागते कारण वितळणाऱ्या बर्फावरून पाऊले टाकून पर्वत चढणे अवघड काम आहे. रुपकुंड (हाडे आणि सापळ्यांचे रहस्यमय तळे ) ट्रेक फारच धाडसी आहे. येथे पर्वतावर उंचीनुसार हवा कमी होत जाते, हवामानात बदल जाणवू लागतात.
सिक्कीम

कांचनगंगा ट्रेक सोळा हजार फुटांपेक्षाही जास्त उंचीचा हा अवघड साहसी ट्रेक आहे. परंतु या शिखरावर नानाविध प्रकराची फुले आहि प्राणी या ठिकाणी पाहावयास मिळतात, तर ती संधी गमावू नका.

भारताचा आर्किड स्वर्ग तसेच पांढऱ्या ढगांनी झाकलेल्या चकचकीत पर्वतरांगा, उंची धबधबे, भव्य गुहा, रंगीबेरंगी फुलांची झालर, विविध प्रकारचे पक्षी-प्राण्याचे सुरिले आवाज असा येथील सदाबहार अंदाज ट्रेकिंगवेळी अनुभवला जातो. एकापुढे एक झुकलेले अनेक पर्वत ट्रेकिंगसाठी नजर गोंधळून टाकतात. ट्रेकिंग बरोबरच रीवर राफ्टिंग आणि अँगलिंग (काट्याच्या साहाय्याने मासे पकडणे) यांचादेखील आनंद घेतला जातो. रीवर राफ्टिंग मध्ये कमेंग, सुबनसिरी, दिबांग आणि सियांग या बलाढ्य नद्या कुशलतेने पार केल्या जातात. तवांग हे ट्रेक ठिकाण तरुणांच्या पसंतीचे आहे. छत्तीसगढमधील बस्तर हे ठिकाण देखील भारतातील साहसी ट्रेकमधील एक नावाजलेले ठिकाण आहे.
भारतातील ही सर्व ठिकाणे धाडसी तरुणांना थ्रीलिंग ऍक्टिव्हिटीसाठी आकर्षित करणारी आहेत आणि हाच प्लॅन पुढील काही दिवसांत तुम्हाला देत आहे इज इंडिया ट्रॅव्हल, तुमच्या त्रिलिंग आयुष्यासाठी. चला तर मग आजच बुकिंग करून आनंद घ्या येणाऱ्या भव्य ट्रेकिंग सोहळ्याचा