आजीबाई असेल तर नक्की वाचा कारण त्यांच्यासाठीच ही खास संधी !
एक होती आजी, शोधू लागली भाजी! अशी कविता लहानपणी पुस्तकात वाचली असेल. आपल्या घरात, शेजारी आणि इतरत्र या आजीबाई आपल्याला पाहायला मिळतात. सर्व गोष्टी बदल्यात परंतु वयोवृध्दांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती बदलला हे बघणे देखील गरजेचे आहे. पूर्वीपासूनच आपण आपली आजी म्हटली कि तिने घरातील लहान मुलांची देखरेख करणे किंवा घरातील छोटी मोठी कामे करणे म्हणजे आईला किंवा इतर लोकांना पाहिजे असलेल्या गोष्टी पुरविणे, जसे कि भाजी निवडणे, लसूण सोलून देणे, कुणाचा रुमाल सापडत नसेल तर तो शोधून देणे. घरातील लहान मुलांना खेळवणे, त्यांना खाऊ घालणे अशी कामे तिच्यासाठी असतातच. मात्र ती आजारी पडली कि सर्वजण ” पिकलेले पान गळणारच ” असे म्हणून दुर्लक्ष करतात आणि तिच्या मरणाची वाट बघतात. म्हणून तर आज वृद्धाश्रमांची संख्या वाढली आहे कारण तेथे त्यांना वृद्ध म्हणून जगवत नाहीत तर एक माणूस म्हणून जगण्याची संधी मिळते. त्यांनीही लहानपण आणि तारुण्य भोगलेलं असतं जसे तरुण जगत असतात. म्हातारपणी त्यांचीही सर्व गोष्टी एन्जॉय करण्याची इच्छा असते. जसे आपण सर्व कामातून कंटाळलो कि कुठे फिरायला जाऊन सर्व तणाव दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी तशीच त्यांचीही इच्छा असते कुठेतरी घरापासून दूर आपल्या समवयीन किंवा त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने राहणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवावा आणि एक नवी संजीवनी पुन्हा आयुष्यात भरावी असे वाटते.
घरातील किरकोळ कामे आणि लहान मुलांचे संगोपन ही खूपच किचकट कामे असतात. लहान मुलांना सांभाळणे म्हणजे स्वर्गातून देवांना जमिनीवर आणण्यासारखे काम असते आणि हे काम आपल्या घरातील प्रत्येक आजीबाईला करायचे असते. दुडूदुडू पळणाऱ्या मुलांमागे धावणे, रडल्यानंतर त्यांचे मनोधरण हे केवळ आजीलाच जमते. घरात एखादे मंगलमय काम करायचे असेल तर त्याच्या सुरवातीपासून संपेपर्यंत आजीकडून माहिती घेऊन करावे लागते आणि आजीदेखील स्वखुशीने सगळी कामे करते त्यावेळी बिचारीचे अक्षरशः कंबरडे मोडते. या सर्व कामांचा तिला कधी कंटाळा आला नसेल का ? आजोबांच्या तुलनेत आजीबाईला घरामध्ये जास्तच काम असते परंतु त्याची जाणीव मात्र फार ठेवली जात नाही. तसेही वार्धक्याच्या विचारांनीच मानसिकता खचून रितेपणा येतो. जगाच्या दृष्टीने निरर्थक होत जाणे, उपभोगाच्या दृष्टीने क्षीण होत जाणे, आयुष्यभराच्या अनुभवांती येणारा तोचतोचपणाचा कंटाळा, अन मृत्यूची चाहूल या गोष्टींचा विचार सातत्याने आजीच्या मनात डोकावतो म्हणूनच मनमोकळं आनंददायी जीवन जगण्यासाठी, सर्व ताण तणाव दूर करण्यासाठी आणि घरातील रोजच्या दैनंदिनीतून काही दिवस सुटका मिळविण्यासाठी इज इंडिया ट्रॅव्हल खास आजीबाईंसाठी टूर प्लॅन आणला आहे, जो अगदी आजीच्या मनासारखा असणार आहे.
तसं पाहिलं तर आजच्या आजीबाई शरीराने आणि मानाने इतक्या खंबीर आहेत कि २५ वर्षाच्या तरुणाला देखील सरस पडतील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या डेथ रेस सायकलिंग स्पर्धेत ७० वर्षीय आजीबाईने ही स्पर्धा जिंकून जागतिक पातळीवर विक्रम नोंदविला. वार्धक्य हे शरिराने येते मनाने नाही आणि मनात काहीतरी करण्याची इच्छा, प्रेरणा, आणि आत्मविश्वास असेल तर हे शारीरिक वार्धक्य देखील नष्ट होते आणि नवी शक्ती व ऊर्जा मिळून वृद्ध दांपत्ये वाखणण्याजोगे पराक्रम करतात आणि यासाठी निसर्गाचे सान्निध्य वृद्धांना एक नवसंजीवनी ठरते जी त्यांना नवीन तारुण्य बहाल करत असते.
आजकाल अनेक सुशिक्षित आणि स्वावलंबी वृद्ध कपल्स सोअसायटीमधून स्वतंत्रपणे राहताना दिसतात आणि ते विशेषतः त्यांच्या आरोग्याची काळजी अगदी काटेकोरपणे घेताना आढळतात. दररोज सकाळी योगा – व्यायाम करणे, पोषक आणि संतुलित आहार घेणे, सोसायटीच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे अशा अनेक ऍक्टिव्हिटी चालूच असतात, असे जीवन जगताना देखील कधीतरी एखादी सहल आपण करावी मग त्यामध्ये देवदर्शन असेल किंवा नैसर्गिक स्थळांची भेट असेल असे चिलिंग लाईफ त्यांनाही हवेहवेसे वाटतेच. जसे लहान मुलांना सहल म्हटली कि मुले अगदी फुलासारखी खुलतात कारण नवीन ठिकाणांबरोबरच नवीन आणि जुन्या मित्रांचा संगम होऊन आनंदाच्या आभाळात ते सैर करतात, हा वेगळा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात यायला हवा आणि प्रत्येक आजीबाईने तो एन्जॉय केला पाहिजे, कारण आपल्याकडे असे म्हटले जाते बालपण आणि म्हातारपण दोन्हीही सारखेच असते. आपल्या समन्वयीन व्यक्तींसोबत वेळ घालविणे, जुन्या सुखद आठवणींना उजाळा देणे आणि नवीन सदाबहार आठवणी तयार करून डोळ्यात साठविणे एक आगळीक असते. म्हणूनच इज इंडिया ट्रॅव्हल ने आजीबाईंच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि भावनांची दखल घेत ही सहल येत्या दिवसांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये आजींसाठी आकर्षक पॅकेज तयार करून त्यामध्ये त्यांची विशेष काळजी घेता येईन अशी व्यवस्था केली जाणार आहे. भारतातील सर्व लोकप्रिय ठिकाणे तुम्हाला दाखवण्यात येतील. तसेच सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ज्यामुळे आजी मुक्तपणे सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतील. चला तर मग आजच आजीबाईंची ही खास सहल बुक करून आनंद मिळवा !
Ranjana Kokane November 16, 2019