Top
  >  Blog Featured   >  नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टपेक्षाही अधिक सुंदर, आकर्षक ‘या’ गोष्टी आहेत, नक्की बघा!

नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टपेक्षाही अधिक सुंदर, आकर्षक ‘या’ गोष्टी आहेत, नक्की बघा!

कमी पैशांमध्ये नैसर्गिक ऍडव्हेंचर, ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेची फॉरेन टूर करायची असेल तर नेपाळ सारखे दुसरे आकर्षक ठिकाण नाही. पर्वतांचा देश म्हटलं कि नेपाळचा महाकाय एव्हरेस्ट लगेच डोळ्यासमोर उभा राहतो. जगातील सर्वात उंच अशा आठ पर्वतरांगा या ठिकाणी आहेत. येथील  पर्वतरांगा, अनेक लहानमोठ्या नद्या तसेच सुंदर निळेशार तलाव, अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी  अशा निसर्गसौंदर्याने नटलेला देश म्हणजे नेपाळ, ज्याच्या अफाट सौंदर्यामुळे आणि येथील अजरामर संस्कृतीमुळे जगभरातून लोक येथे भेट देऊन आनंदोत्सव साजरा करतात. पर्यटन हा नेपाळचा प्रमुख व्यवसाय आहे. या देशाचा इतिहास बघितला तर या देशावर दुसऱ्या कोणत्याही देशाने राज्य केले नाही आणि ते कुणाचे गुलामही बनले नाहीत त्यामुळे येथे स्वतंत्रदिवस साजरा केला जात नाही. तरीही येथील मिलिटरी सैन्य अतिशय सक्षम आहे, ज्यांची मदत ब्रिटनसुद्धा घेते. हा देश जरी पर्वतरांगा आणि निसर्गसौंदर्यामुळे ओळखला जात असला तरी येथील संस्कृती हि जगातील प्राचीन आणि मनमोहक आहे. नेपाळ हा हिंदू आणि गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो. या दोन्हीही संस्कृती येथे फार प्रेमाने आणि सुंदररित्या जोपासण्यात आलेल्या आहेत. येथे कधीही धर्मयुद्धे झाली नाहीत किंवा धर्मामुळे कुणाचा बळी घेण्यात आलेला नाही. अगदी सौख्याने हिंदू आणि बौद्ध संस्कृती या ठिकाणी नांदते आहे. उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगा आणि हिंदू- बौद्ध संस्कृतीची विरासत पर्यटकांना आकर्षित आणि आंनदी करण्यासाठी पुरेशी आहेत. चला तर बघूया इज इंडिया ट्रॅव्हल तुमच्यासाठी कोण-कोणती ठिकाणे ऑफर करत आहेत.

 

नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी शिव पार्वती समर्पित ऐतिहासिक पशुपतीनाथ मंदिर आहे. बागमती नदीच्या तीरावर हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराच्या आजूबाजूला देखील अतिशय सुंदर नजारे पाहावयास मिळतात. या मंदिरामध्ये फक्त हिंदूंना प्रवेश दिला जातो अन्य बाहेरूनच दर्शन घेऊ शकतात. पशुपतीनाथ म्हणजे समस्त प्राण्यांचे स्वामी. या ठिकाणी भगवान शिव हे चतुर्मुखी आहेत. या मंदिराचा संबंध भारतातील केदारनाथ मंदिराशी असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे भारताचे नेपाळशी हजारो वर्षांपासून आध्यत्मिक नाते आहे. या मंदिराचे चार वेगवेगळे दरवाजे चतुर्मुखी मूर्तीच्या दिशेने आहेत. हे चारही दरवाजे चांदीने मढलेले आहेत तसेच मंदिराचा कळस हा सोन्याने लखलखीत आहे.  मंदिराच्या बाहेर हजारो कबुतरे येतात. तो नजारा बघणे देखील लोभनीय  आहे. पशुपतीनाथ मंदिरापासून १ किमी अंतरावर बागमती नदीतीरावर गुज्जेश्वरी मंदिर आहे. हे मंदिर आदिशक्तीला समर्पित आहे. पशुपतीनाथ मंदिरापासून अडीच किमी अंतरावर युनेस्को मान्यताप्राप्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गौतम बुद्धांचे स्तूप मंदिर आहे. ३६ मी उंचीचे पांढरे शुभ्र स्तूप वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. असे सांगितले जाते कि, ज्यावेळी हे  स्तूप बांधण्यात येत होते त्यावेळी प्रचंड दुष्काळ पडला होता तेव्हा दवबिंदूच्या पाण्याने हे स्तूप बांधण्यात आले. आजूबाजूला स्ट्रीट शॉपिंग आहे जेथे तुम्ही नेपाळचे पारंपरिक-  मॉडर्न आकर्षक दागिने, कपडे आणि सुशोभीकरणाच्या वस्तू विकत घेऊ शकता. नेपाळ एक शांतीप्रिय, विनम्र आणि इमानदार देश आहे, इथे आल्यानंतर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, जसे कि हॉर्न वाजविणे, ओव्हरटेक न करणे हे येथे अशोभनीय मानले जाते, यासाठी तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. काठमांडूपासून १० किमी अंतरावर शिवपुरी टेकडीजवळ बुढा नीलकंठ मंदिर आहे. मंदिरात शिवाची चतुर्भुजी मूर्ती पाण्यामध्ये निद्रावस्थेत अतिशय सुंदर आहे.

काठमांडूपासून काही अंतराच्या एका टेकडीवर स्वयंभूनाथ मंदिर आहे. अनेक पायऱ्या चढून या मंदिरात दर्शनासाठी जावे लागते. पाचव्या शतकात निर्माण केलेले हे मंदिर ‘मंकी मंदिर’ म्हणूनदेखील ओळखले जाते. बासुरीचे आणि इतर पारंपरिक वाद्यांचे कर्णमधुर सूर तरुणाईकडून या ठिकाणी छेडिले जातात. या पारंपरिक सुरांनी प्रेक्षकांचे कान अगदी तृप्त होऊन जातात. या मंदिरापासून काठमांडू शहराचा नजारा काही औरच दिसतो.

काठमांडूपासून साधारणतः ६ तासांच्या अंतरावर पोखरा शहर आहे. या नागमोडी हरित वळणांवर सप्टेंबर ते डिसेंबर प्रवास अतिशय अल्हाददायक आहे. फेब्रुवारी मध्ये देखील तुम्ही येथे येऊ शकता फक्त थंडीचा कडाका थोडा जास्त असतो आणि मार्च ते जून उन्हाळा जास्तच असतो. भारताची आणि नेपाळची संस्कृती काहीशी सारखीच असल्याने आपलेपणाचा आभास नक्की येतो. नेपाळला ‘भटकंतीचा स्वर्ग’ देखील म्हटले जाते. नैसर्गिक दागिन्यांची देणगी पोखरा शहराला मिळालेली आहे. येथे एकाच ठिकाणाहून सुंदर आणि मोठी तळी, बर्फाने झाकलेले पर्वत तसेच उंच उंच झाडांचे हिरवे जंगल बघणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. काठमांडूनंतर पर्यटक पोखरा सिटीला भेट देणे पसंत करतात. फेवा तलाव, बाराही मंदिर, गुप्तेश्वर गुहा मंदिर, पोखरा संग्रहालय बघण्यासाठी अतिशय सुंदर ठरतात. येथील सागरमाथा राष्ट्रीय उद्यान हे वैश्विक दर्जाचे असून निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. अनेक प्रकारचे प्राणी पक्षी याठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. या ठिकाणाहून माउंट एव्हरेस्ट देखील दिसतो.

मुक्तिघाटस्थित भगवान विष्णूचे ‘मुक्तिनाथ मंदिर’ हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये शालिग्राम नावाच्या शिळेची पूजा केली जाते, मानले जाते कि या शिळेमध्ये भगवान विष्णूचा वास आहे, त्यामुळे हे मंदिर पवित्र मानले जाते. हे मंदिर पॅगोडा वास्तुकलेमध्ये आहे. हे मंदिर हिमालयामध्ये ३ हजार ७०० मीटरपेक्षाही जास्त उंचीवर असल्याने प्राकृतिक सुंदरतेचा अनुभव विलोभनीय आहे.

काली गंडकी आणि त्रिशूली नद्यांच्या संगमावरील देवघाटधाम एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. जवळच चितवन राष्ट्रीय उद्यानदेखील आहे. मकरसंक्रांतीवेळी अनेक हिंदू या ठिकाणी पाण्यात डुबकी मारण्यासाठी येतात. या ठिकाणी त्रिवेणी मंदिर, वाल्मीकि आश्रम, सोमेश्वर कालिका मंदिर किल्ला, पांडवनाथ, कबिलासपुर हि ठिकाणे देखील प्रेक्षणीय आहेत

भारत- नेपाळच्या सीमेलगतच्या भागात लुम्बिनी हे गौतम बुद्धांचे पवित्र स्थळ आहे. अनेक बुद्ध अनुयायी या ठिकाणाला भेट देतात. रुमिनोदेई गाव हेच लुम्बिनी गाव आहे. या ठिकाणी शाक्य राजकुमार भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. भारतीय सम्राट अशोकाचे स्मारक स्तंभ देखील या ठिकाणी स्फूर्तिदायी आहेत. या ठिकाणाला युनेस्कोचा जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. येथे ८ वर्ग किलोमीटर अशी मोठी सुंदर बाग आहे. जेथे ऐतिहासिक गोष्टींचे नमुने पाहावयास मिळतील. येथील मायादेवी  मंदिरात मायादेवी गौतम बुद्धांना जन्म देतानाची मूर्ती आहे. या सर्व ठिकाणांचा आनंद तुम्हाला आमच्या इज इंडिया ट्रॅव्हल कडून नक्की देण्यात येईल, त्यामुळे आजच रजिस्टर करून नेपाळच्या सहलीचा आनंद घ्या.

Ranjana Kokane October 16, 2019