Ease India

  • Home
  • Blogs
  • हि ५ आश्चर्यकारक ठिकाणे बघा अंदमान बेटावर!

हि ५ आश्चर्यकारक ठिकाणे बघा अंदमान बेटावर!

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard

आयुष्याची खरी मजा म्हणजे प्रवास. प्रवास नाही, आयुष्य नाही. काम करा, पैसे कमवा आणि प्रवास करा… हेच आयुष्य आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, प्रवास तर तुम्हाला करायचाच आहे. मग तो निसर्गाच्या सानिध्यात.. सुखाच्या कुशीत.. असा का नसावा. असाच प्रवास आम्ही तुमच्यासाठी सुरु केला आहे आणि यावेळी आंम्ही तुम्हाला घेऊन जातोय अंदमान आइसलँडवर. या ठिकाणी आपण बघणार आहोत येथील ५ प्रमुख ठिकाणे.

  1. सेल्युलर जेल
  2. स्कुबा डायविंग आणि स्नोर्कलिंग
  3. राधानगर बीच
  4. चिडीया टापू
  5. नाईट कायाकिंग

सेल्युलर जेल

हे ठिकाण काळ्या पाण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते कारण स्वातंत्र्ययुद्ध काळात अनेक स्वातंत्र्यसेनानींना या जेलमध्ये बंदिस्त राहावे लागले. या ठिकाणी एक म्युझिअम आहे. स्वातंत्र्ययुद्धामध्ये सामील झालेल्या आणि ज्यांना या जेलमध्ये कैद करण्यात आले होते त्या सर्व सेनानींच्या स्वातंत्र्ययुद्धातील योगदानाबद्दल माहिती याठिकाणी नमूद केली आहे. या जेलमध्ये ६९४ कोठड्या आहेत. या जेलच्या टेरेसवरून भारतीय समुद्रतटाचा नजारा अतिशय सुंदर दिसतो. समुद्राच्या किनाऱ्यालगत हा तुरुंग असल्यामुळे कुणीही येथून पळू शकत नव्हते म्हणून ब्रिटिशांकरिता हा जेल महत्वाचा होता. या टेरेसवरून समुद्राचे पाणी काहीसे काळ्या रंगाचे दिसते म्हणूनच येथील कारावास शिक्षेला काळ्या पाण्याच्या शिक्षा म्हटले जायचे.

स्कुबा डायविंग आणि स्नोर्कलिंग

अंदमानला गेल्यावर आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही वॉटर ऍक्टिव्हिटी ठेवणार आहोत एक म्हणजे स्कुबा डायविंग आणि दुसरी वॉटर स्नोर्कलिंग. थ्रिलिंग स्कुबा डायविंग करण्यासाठी तुम्हाला स्विमिंग आलेच पाहिजे असे बिलकुलहि नाही. स्विमिंग न येणाऱ्यांना देखील स्कुबा डायविंगचा आनंद घेता येतो. पाण्यामध्ये गेल्यावर तुम्हाला एक वेगळीच दुनिया पाहायला मिळते, वेगळ्या जीवांची वेगळी दुनिया अनुभवायची असेल तर स्कुबा डायविंग करणे गरजेचे आहे. स्नोर्कलिंग वॉटर ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही तुम्हाला एक जॅकेट आणि एक गोल आकाराची ट्यूब देणार आहोत ज्यामूळे तुम्ही पाण्याच्या वरच्या भागावर तुम्ही अलगद तरंगू शकाल. पाणी स्वच्छ असल्यामुळे तुम्ही माश्यांसोबत देखील खेळू शकता किंवा माशांना जवळून बघू शकता.

राधानगर बीच

हे भारतातील नव्हे तर जगातील टॉप वन बीच आहे. जगातील ५ व्या क्रमांकाचे लोकप्रिय बीच आहे. खरोखरच बीच एन्जॉय करायचे असेल तर हॅवलॉक टापूवरील या राधानगर बीचला अवश्य भेट द्या. अत्यंत साफ आणि निळेशार पाणी या बीचवर आहे. असे वाटते कि आपण कुठल्या फॉरेन बीचवर आहोत.फार लोकांना याबद्दल माहिती नसल्याने हे व्यवस्थितरीत्या असल्याचे म्हटले जाते. फार साफ असल्यामुळे जागतिक पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. येथे तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत आनंद घेऊ शकता. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे.

चिडीया टापू

अंदमान लव्हर्स साठी पोर्ट ब्लेअर वरील चिडिया टापू एक सुंदर ठिकाण आहे. इथे स्पेशल दोन गोष्टींसाठी पर्यटक येतात.  त्या म्हणजे येथील छोटासा बीच आणि सनसेट व्हिव. संध्याकाळी ५ च्या सुमारास आलात कि तुम्ही सनसेट आणि निरनिराळे पक्षी या ठिकाणचा अतिशय सुंदर नजारा बघायला मिळेल. येथे मुंडापहाड हा ३०० मी उंचीचा ट्रेकिंग स्पॉट आहे. तेथे पोहचल्यानंतर उंचीवरून समुद्र नजारा फार सुंदर दिसतो. तसेच आजूबाजूला खूप उंचीचे वृक्ष देखील पाहावयास मिळतात.

नाईट कायाकिंग

ही एक चॅलेंजिंग वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे. पण जे अंदमानला जाणार आहेत त्यांनी या ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतला पाहिजे. ज्या लोकांना नेहमी धाडसी कृत्ये करण्यात आनंद वाटतो ते ही गोष्ट नक्कीच करणार. आता कायाकिंग प्रकार आहे काय हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असणार. या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला एक बोट दिली जाते आणि ज्याच्यावर स्वार होऊन तुम्हाला समुद्राच्या पाण्यात फिरायचे असते. हि बोट पुढे जाण्याकरिता तुम्हाला दोन्ही बाजूनी वल्हवायची असते. चॉईस तुमची आहे कि तुम्ही एकटे करू शकता कि सोबत कुणी ठेवणार ? पण एकट्याने केलेली कायाकिंग जर्नी अविस्मरणीय ठरेल. या धाडसी कार्यक्रमामध्ये तुम्ही समुद्रातील जीवजंतू तसेच समुद्रातील मॅन्ग्रोव्ह वनस्पतींचे सौंदर्य जवळून अनुभवाल. समुद्राचे सौंदर्य जवळून अनुभवाल अगदी पाण्याचाच एक भाग म्हणून. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाची किमया ओळखणे, अनुभवणे हा देखील एक सुखद अनुभव आहे. नाईट कायाकिंग ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी ही हॅवलॉक बीचवर करण्यात येणार आहे. हा बीच कायाकिंग ऍक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे.

थोडक्यात, वरील हि पाच अभूतपूर्व ठिकाणे तुम्हाला अंदमान बेटावर बघायला मिळणार आहेत अगदी थ्रिलिंग आणि कधीही न विसरणारा असा हा तुमचा अनुभव असणार आहे. तरुणांनी नक्की या थ्रिलिंग ऍडव्हेंचर संधीचा फायदा घ्या आणि आम्हाला कळवायला विसरू नका. आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघत आहोत.

×