- easeindia
- April 14, 2025
आजकाल कारगिल युद्धाची आठवण देण्यापेक्षा भटकंतीचे स्वर्ग ओळखू लागले आहे. अनेक लोक कारगिल सुट्ट्या काढून भेट देत आहेत कारण आत्ताच्या मोबाईल युगात व्हिडीओ आणि चित्रांमधून मधून कारगिलचे सौंदर्य सर्वांना आपल्याकडे खेचून घेत आहे. मग इच्छेला आवर घालणं कठीण होतं. जे तुम्ही वरती ढगात बघता ते तुम्हाला कारगिलच्या भूमीवर बघायला मिळतं इतकं अलौकिक आणि सुंदर दृश्ये येथे पाहावयास मिळतात. १९९९ च्या युद्धामुळे येथील जनजीवनात काही अस्थिरता निर्माण झाली परंतु आत्तातरी हा भूभाग प्रामुख्याने पर्यटन स्थळ म्हणूनच नावाजला जातोय.
कारगिलमध्ये प्रामुख्याने तुम्ही कुठल्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता हे आपण जाणून घेऊ या.
कारगिल ट्रेकिंग

उंच हिमालयीन पर्वतरांगांमध्ये कारगिल येते त्यामुळे या उत्तुंग पर्वतरांगांवर ट्रेकिंग करण्याचा मोह येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला होतो नाहीतर येथे भेट दिल्याचा आनंद सहसा येणार नाही. उंचावर घडलेली युद्धठिकाणे पाहण्यासाठी देखील पर्यटक ट्रेकिंग करतात आणि तसेही जेव्हा तुम्ही कारगिलच्या रस्त्याने स्वारी करू लागता तेव्हाच जिकडे बघावे तिकडे उंच बर्फाच्छादित पर्वत दिसू लागतात त्यामुळे ट्रेकिंगचा आनंद घेण्याची इच्छा आवरत नाही आणि ट्रेकिंगपासूनच प्रवास सुरु करायला सुरुवात होते. झास्कर घाटीमधील ४००० मीटर पेक्षाही उंच पर्वतरांगावर तुम्ही ट्रेकिंग करू शकता. पदूम- किश्तवार लोकप्रिय ट्रेकिंग स्पॉट मानली जातात. परंतु जे प्रथमतः कारगिल मध्ये ट्रेकिंगसाठी जाणार आहेत त्यांनी कृपया गाईड सांगतील त्याप्रमाणे सर्व काळजी घेणे आवश्यक आहे कारण येथील ट्रेकिंग धोकादायक देखील आहे.
कारगिल लोकसंस्कृती

कारगिल वॉर मेमोरियल

हे स्मारक आपल्या सर्वाना माहिती आहे कारण प्रत्येक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आपण हे ठिकाण टीव्ही वर बघतो आणि गर्व होतो आपण भारतीय असल्याचा. परंतु या ठिकाणाला आपण भेट देऊन आपल्याला अधिक आनंद आणि गर्व नाही का होणार ? खरोखर हे ठिकाण प्रत्येक भारतीयाच्या गर्वाचे आहे तसेच येथील परिसरात वावरल्यावर एका नवीन ठिकाणाची सहल देखील होईल आणि प्रत्यक्षात आपल्या आर्मीच्या लोकांना जवळून पाहता येईल, त्यांचे आयुष्य किती खडतर असते याची जाणीव होईल. कारण आपण सर्व १९९९ च्या युद्धाचे साक्षी आहोत. त्यावेळी झालेले कारगिल युद्ध आपण चित्रांद्वारे दूरदर्शनवर बघितले असेल. गुलाबी रंगाच्या भिंतींनी घेरलेल्या प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहिहिले दिसेल ‘“Forever in operation. All save some, some save all, gone but never forgotten.”(सर्व काहींना वाचवतात, काही सर्वांना वाचवतात, गेलेले आहेत परंतु त्यांना कधीही विसरलेलो नाहीत) अशी आहे आपल्या जवानांची गुणगाथा. आतमध्ये गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला तिरंगे फडकताना दिसतील. त्याला पाहून आपण आपली जात, धर्म, भाषा, प्रांत विसरून फक्त भारतीय असल्याची जाणीव होते. या स्मारकाच्या आजूबाजूला ते सर्व पर्वत आणि शिखरे आहेत ज्यांना शत्रूंनी काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. या स्मारकाच्या दालनात त्या सर्व शस्त्र सामग्री आहेत ज्यांचा या युद्धात प्रत्यक्ष वापर केला गेला होता. तसेच शहिद झालेल्या सर्व जवानांचे फोटो येथे लावलेले आहेत. अमर ज्योतीला भेट देऊन या जवानांना श्रद्धांजली देणे हीदेखील खूप गर्वाची गोष्ट आहे. मनोज पांडे संग्रहालय देखील पर्यटकांना कारगिल युद्धाबद्दल खूप माहिती देते, जेथे युद्धादरम्यानचे अवशेष ठेवण्यात आलेले आहेत. ‘आपल्या उद्यासाठी त्यांनी त्यांचा आज कुर्बान केला’ हा संदेश कारगिल युद्धातील शाहिद जवानांनी आपल्यासाठी ठेवला आहे तो एकदा बघा.